भयंकर! दारुड्या बापानंच आपल्या पोट्याच्या मुलाला 5 लाखांत तृतीयपंथीयाला विकलं

भयंकर! दारुड्या बापानंच आपल्या पोट्याच्या मुलाला 5 लाखांत तृतीयपंथीयाला विकलं

मात्र, काही दिवसातच उत्तम याचं बिंग फुटलं. मुलाच्या आजोबांना ही बाब समजली.

  • Share this:

कोल्हापूर, 20 सप्टेंबर: कोरोनामुळे राज्यात अनेकांची नोकरी गेली आहेत तर बहुतांश नागरिकांचा उद्योगधंदा ठप्प झाला आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हाताचं काम सुटल्यामुळे दारुच्या व्यसनाच्या आहारी केलेल्या एकानं चक्क आपल्या पोटच्या मुलाला 5 लाखांत तृतीयपंथीला विकलं. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...द्रोह करणाऱ्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा...

नेमकं काय आहे प्रकरण?

कोरोनामुळे काम नाही... व्यसनाधीनतेत जीवन बुडालेले...पत्नी आजारी, वयोवृद्ध आई वडील अशात आयुष्याचा आधार असलेल्या पोटच्या गोळ्याला चक्क तृतीय पंथीयांला विकण्याचे कृत्य कोल्हापूरातील एका बापाने केले. दहा वर्षांचे ते चुणचुणीत पोर, बापाच्या त्रासाला जणू कंटाळून गेले होते. आई जवळ नाही, नातेवाईकांचे प्रेम नाही त्यामुळे आज पोलिस ठाण्यात प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलाने बापाचा हात झिडकारून तृतीय पंथीयांचा हात धरला.

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या हातचे काम गेले. त्याचप्रमाणे पाटील कुटुंबातही अडचणी आल्या. दिगंबर उर्फ उत्तम जोतिराम पाटील असे मुलगा विकणार्या बापाचे नाव. उत्तम चांदी कारागिर असूनही व्यसनी असल्याने घरगाडा चालवणे त्याला कठिण जात होते. अशातच कोरोनामुळे अनेक महिने हाताला काम नाही.मुलाचा सांभाळ करणेही त्याला कठिण बनले. म्हणून एका तृतीयपंथीला आपल्या दहा वर्षीय शाळकरी मुलग्याला त्याने नोटरीव्दारे दत्तक दिले. हा दत्तक प्रकार तब्बल चार महिन्यानंतर शनिवारी (19 सप्टेंबर) दुपारी शहरातील एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्यामुळे उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दत्तक दिलेल्या मुलग्यासह त्यांचे वडील उत्तम पाटील आणि संबंधीत तृतीयपंथीयाला पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी सुरु केली.

पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील काटे भोगाव येथील दिंगबर उर्फ उत्तम जोतीराम पाटील या युवकाचा माजगाव (ता. पन्हाळा) येथील एका युवतीशी 17 वर्षापूर्वी विवाह झाला असून, या दाम्पत्याला दोन मुले आहेत. शहरातील एका चांदी उद्योजकाकडे दिंगबर उर्फ जोतीराम हा चांदी कारागीर म्हणून काम करतो. कामानिमित्त अनेक वर्षांपासून आई-वडीलाच्या समवेत उत्तम कोल्हापूरात राहतो. सध्या तो गंगावेश परिसरातील सावंतवाडा येथे राहत आहे. पत्नीला मानसिक आजाराची लागण झाली.औषध उपचार केले. पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही, मोठा मुलगा स्वतःकडे ठेवून घेवून, त्यांने मनोरुग्ण पत्नी आणि लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी सासरवाडीला पाठविले

याचदरम्यान कोरोना संसर्गजन्य विषाणूची महामारी सुरु झाली. या महामारीमुळे दिंगबर उर्फ उत्तमचे काम बंद झाल्याने त्यांच्या कुटूंबाची वाताहत होवू लागली. त्यामुळे त्यांने आपल्या दहा वर्षाच्या मुलग्याचा सांभाळ करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला. शहरातील राजेंद्रनगर रोडवरील साळोखे पार्कमध्ये राहणाऱ्या गजेंद्र गुंजाळ नामक तृत्तीयपंथीयाने मुलग्याला नोटरीव्दारे त्यांने दत्तक घेतले. हा दत्तकाचा कार्यक्रम मे महिन्यात कोरोनाचा लॉकडाऊनमध्ये साळोखे पार्कमध्ये झाला. या दिवसापासून या मुलगा या तृत्तीयपंथीकडे राहत आहे.

हेही वाचा...संजय राऊत यांचा मोदी सरकारला खोचक सवाल, मंत्र्यांनं अफवेमुळे राजीनामा दिला का?

अनलॉकमध्ये आपला नातू जावयाने एका तृत्तीयपंथीयाला दिल्याची माहिती उत्तमच्या सासूला समजली.तिने याबाबत जावयाकडे अनेकदा विचारणा केली. पण तो उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागला. अखेर शनिवारी सकाळी शहरातील एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्या मदतीने शहर पोलिस उपाधिक्षक प्रेरणा कट्टे यांच्या कडे धाव घेतली. त्यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेवून दिंगबर उर्फ उत्तम, संबंधित तृत्तीयपंथासह संबंधीत मुलग्याचा शोध घेवून सर्वांना ताब्यात घेवून चौकशी करण्याबाबतचा आदेश दिला. त्यावरुन पोलिसांनी या सर्वांचा शोध घेवून त्वरीत ताब्यात घेवून चौकशी सुरु केली. सध्या मुलाला बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 20, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading