पुण्यात राजकारण तापलं! भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला वादग्रस्त प्रस्ताव

पुण्यात राजकारण तापलं! भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला वादग्रस्त प्रस्ताव

पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना राजकारण चांगलंच तापलं आहे.

  • Share this:

पुणे, 9 जून: पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना राजकारण चांगलंच तापलं आहे. शहरातील रस्ते रुंदीकरण मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. पुण्यातील 6 मीटरचे 323 रस्ते 9 मीटर करण्याचा वादग्रस्त प्रस्ताव अखेर भाजपनं मंगळवारी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. भाजपने यासाठी व्हीप काढला होता.

हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाढी-कटींग कुठे करतात? भाजप नेत्याचा खोचक सवाल

शहरातील 6 मीटरचे सर्वच म्हणजे 4000 रस्ते 9 मीटर करण्याची उपसूचनाही मान्य करत विरोधकांवर कुरघोडीही करण्याचा यावेळी प्रयत्न केला. एकही रस्ता रुंद होणार नाही. केवळ या रस्त्यांच्या माध्यमातून टीआरडी आणि एफएसआयद्वारे बिल्डर्सचं उखळ पांढरे होईल, भाजपची ही दुकानदारी, खाबूगिरी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार हाणून पाडेल, म्हणत विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

दुसरीकडे, पुण्यात सध्या कोरोना टेस्टिंगसाठी नागरिकांचं स्वॅब घेण्याचं प्रमाण वाढलं. मात्र चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. NIV ची क्षमता मर्यादित आहे, यामुळं ससूनमध्ये 24 कोटी खर्चून चाचणी केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यात राज्य सरकारचे 10 कोटी, पुणे पालिकेचे 6 कोटी आणि पिंपरी चिंचवड पालिकेचे 4 कोटी तसेच जिल्हा नियोजन समितीचे 4 कोटी असे 24 कोटी उभे होतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

हेही वाचा...शरद पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा

व्यापाऱ्यांची मागणी अयोग्य..

दुसरीकडे, कंटेन्मेंट झोन्समध्ये दुकाने सुरू करण्याच्या व्यापाऱ्यांची मागणी अयोग्य आहे, असं म्हणत महापौरांनी व्यापाऱ्यांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. सध्या कंटेन्मेंट झोन्समध्ये अत्यावश्यक सुविधा पुरवणारी दुकाने सकाळी 9 ते 2 सुरू आहेत. मात्र, इतर दुकाने ही सुरू करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

First published: June 9, 2020, 7:37 PM IST
Tags: #PuneBJP

ताज्या बातम्या