शरद पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर जितेंद्र आव्हाडांनी असा साधला निशाणा

शरद पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर जितेंद्र आव्हाडांनी असा साधला निशाणा

आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावं. जणू काही ते दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत...

  • Share this:

मुंबई, 9 जून: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यध्य शरद पवार सध्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे.  शरद पवार कोकणात नुकसानीची पाहणी करत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांच्या दौऱ्याला उशीर झाला, असेही ते म्हणाले आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे.

हेही वाचा.. निसर्ग चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं केलं! शरद पवार थेट बांधावर, मदरशालाही भेट

आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावं. जणू काही ते दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान साधलं आहे.

1972 साली दुष्काळ पडला तेव्हा गावागावात पोहचले शरद पवार... 1993 चा बॉम्बस्फोट झाला आणि त्याचा धुराळा खाली उतरत नाही तर पवार साहेब जागेवर पोहचले. किल्लारी चा भूकंप झाला... तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना कळण्याच्या आत पवार साहेब किल्लारीला पोहचले, शरद पवार यांच्या या जनसेवेची जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांना आठवण करून दिली.

तेव्हा कुठे होते भाजप नेते..?

पण जेव्हा कोल्हापूरमध्ये पूर आला तेव्हा भाजपचे नेते कुठे होते, याचा शोध तर घ्यावा. त्याही परिस्थितीमध्ये स्वतः शरद पवार साहेब 2 फूट पाण्यामधून चालत अंगठ्याला जखम असताना देखील गेले.

आपल्या 50 वर्षांच्या कारकर्दितीत जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर नाही तर देशावर प्रसंग ओढवला तेव्हा मदतीला धावणारे शरद पवार साहेब आहेत. अगदी गुजरातच्या भुकंपात सुद्धा त्यांनी अभुतपूर्व काम केलं आणि म्हणूनच स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख बनवलं. आपलं हेलिकॉप्टर गारा पडतायेत म्हणून खाली उतरल्यानंतर त्याचं अवस्थेत चिखल तुडवत द्राक्षे आणि डाळींबांच्या बागांमध्ये जाणारे शरद पवार साहेबच होते. तेव्हा त्यांना दौऱ्यावर उशीर झाला असं म्हणण हे आपल राजकीय प्रगल्भत्व सिद्ध करतं, अशा शब्दांत आव्हाड यांनी पाटील यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा.. 'साहेब घाटावर जास्त लक्ष देता...', कोकणात शरद पवारांसमोरच तरुणाने व्यक्त केल्या संतप्त भावना

कोव्हिड-19 सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्वत:ला दाराच्या आत न-ठेवता, वय वर्षे 80 असताना देखील महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, मुंबईमध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी न-घाबरता बाहेर पडणारे ते एकमेव नेते आहेत. आजही सकाळी 8 वाजल्यापासून लोकांना भेटण्याची त्यांची दिनचर्या खंडीत झालेली नाही. म्हणुनच चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार साहेबांबद्दल टीका करण्याच्या आधी कमीत-कमी जणाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

First published: June 9, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या