जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाढी-कटींग कुठे करतात? भाजप नेत्याचा खोचक सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाढी-कटींग कुठे करतात? भाजप नेत्याचा खोचक सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाढी-कटींग कुठे करतात? भाजप नेत्याचा खोचक सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज टापटीप दिसतात, ते नेमके कुठे दाढी-कटींग करतात

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जून: गेल्या अडीच महिन्यांपासून महाराष्ट्र लॉकडाऊन आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्यात काही उद्योग, व्यवसायाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यात सलून-पार्लर बंद असल्याने नाभिक समाजावर अन्याय होत आहे, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. हेही वाचा.. शरद पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज टापटीप दिसतात, ते नेमके कुठे दाढी-कटींग करतात, असा खोचक सवाल देखील आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड म्हणाले की, महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यास सुरुवात झाली असली, तरी अद्याप मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा सलून, ब्युटी पार्लर उघडण्यात आलेले नाहीत. नाभिक समाजावर अन्याय का? नाभिक समाजावरील अन्याय सरकारने दूर करुन कोविड 19 चे सर्व नियम घालून त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी सरकारकडे केली. नाभिक समाजावर एवढे मोठे बंधन घालण्याचे काही कारण नाही. वंचित’च्या नगरसेवकानं रस्त्यावर कापले केस दुसरीकडे, सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकानं अनोखं आंदोलन केलं आहे.  गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. कटिंगचे दुकाने सुरु करण्यास राज्य सरकारनं परवानगी द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी रस्त्यावर प्रतिकात्मक केस कापून अनोखं आंदोलन केलं. राज्य सरकारने गेल्या आठवड्यापासून काही व्यवसाय, उद्योग व दुकाने यांना सशर्त उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून नाभिक समाजाचे उपजिविकेचे साधन असलेले कटिंग दुकान, पार्लर यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. हेही वाचा.. VIDEO: शरद पवारांनी भाजपला दिली ‘विदुषका’ची उपमा, ते काय म्हणाले ऐका! कुटुंब व दैनंदिन गरजा भागवण्याकरता इतर व्यवसाय व उद्योगाप्रमाणे नाभिक समाजाच्या सलून दुकानांनाही नियम व अटी घालून व्यवसाय चालू करण्यास परवानगी देण्यात यावी. किंवा व्यवसाय सुरू न झाल्यास नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला महिना 10 हजार रुपये अनुदान स्वरूपात देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात