पिपंरी-चिंचवड, 30 एप्रिल: पुण्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवत वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील वाढीव कोरोनाबाधित रुग्णांना पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचारसाठी हलवण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, पुण्यातील रुग्ण पिंपरीत आल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येईल, असं म्हणत पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे.
हेही वाचा...महाराष्ट्रातला राजकीय पेच : राज्यपालांनी केली विधानपरिषद निवडणुकांसाठी विनंती
पिंपरी-चिंचवडची यंत्रणा पुण्याच्या तुलनेत तुटपुंजी आहे. पिंपरीतील रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत पुण्याचे रुग्ण पिंपरीत पाठवले गेले तर सर्व यंत्रणा विस्कळीत होण्याची भीती आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील रुग्णांना पिंपरी-चिंचवडमध्ये पाठवू नये, असं आमदार लांडगे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने घेतला आता महत्त्वपूर्ण निर्णय
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी मागील काही दिवसांपासून पुणे आणि खडकी परिसरातील रहिवासी असलेले अनेक नागरिक तपासणीसाठी पिंपरीत येत असल्याचं मान्य केलं आहे. त्या पैकी काहीजण कोरोनाबाधित आढळल्याने त्यांना उपचारासाठीही दाखल केल्याच साळवे म्हणाले, मात्र आम्ही केवळ पिंपरी शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढेल ही शक्यता लक्षात घेऊनच तेव्हढीच तयारी केली असल्याचही सांगायला साळवे विसरले नाही.
भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीचाही विरोध...
पुण्यातील कोरोनाबाधित रुग्ण पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याच्या हालचाली सुरु आहे. यास भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेगी विरोध केला आहे. आधीच पिंपरीत वैद्यकीय सुविधा कमी मर्यादित आहेत. त्यात पुण्यातील रुग्ण उपचारासाठी पिंपरीत आणल्यास येथे रुग्ण वाढल्यास कुठे जाचयं, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोणत्याही पक्षाने ऐन संकटात प्रतिष्ठेचा मुद्दा करु नये. एका परिस्थिती सगळ्यांनी एकत्र येऊन कोरोनास हद्दपार करावे, अशी भूमिका शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे.
संपादन- संदीप पारोळेकर