पुणे, 29 नोव्हेंबर: खासदार छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंचं मराठा समाजातील नेतृत्त्व मान्य आहे. पण त्यांच्या राजकीय भूमिकेशी आम्ही सहमत असूच असं अजिबात नाही, असं मोठं विधान मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संजीव भोर यांनी केलं आहे. मराठा समन्वय समितीचे हे बिगर राजकीय व्यासपीठ असल्याचंही संजीव भोर यांनी सांगितलं आहे.
मात्र, खासदार संभाजीराजे आमच्यावतीनं राज्य सरकारशी बोलू शकतात, असं मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितलं आहे. मराठा क्रांती मोर्चा राज्यस्तरीय निर्णायक बैठक आज रविवारी पुणे येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थी व नोकरी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश प्रक्रिया सुरु केल्या प्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे.
हेही वाचा...उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचं आठवतं, पण याचा पडला विसर; दानवेंनी डिवचलं
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे. प्रवेश प्रक्रियेत घोळ घातला आहे, असा आरोप राजेंद्र कोंढरे यांनी केला. मराठा विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मंत्र्यांनी मराठा-ओबीसी वाद पेटवू नये, असा टोला राजेंद्र कोंढरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी लगावला. मराठा समाजाला न्याय मिळावा हीच अपेक्षा, असल्याचंही कोंढके यांनी सांगितलं.
राजेंद्र कोंढरे यांनी सांगितलं की, शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन हा नाशिक संघटनेचा निर्णय आहे. त्याबाबत आजच्या बैठकीत काही निर्णय झालेला नाही.
अधिवेशन कळात मुंबईत मराठ्यांचा लॉंग मार्च
महावितरणमध्ये मराठा उमेदवारांना डावलून उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरणनं घेतल्याने मराठा समाज येत्या 1 व 2 डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्यात अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात करणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.
2014 ते 2020 प्रलंबित शासकीय नियुक्ती उमेदवार प्रश्न, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुपर न्युमररी, अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित करणे असे अनेक प्रश्न शासनाने सोडलले नसल्याने मराठा तरुण आक्रमक झाला आहे.
हेही वाचा...'भाजपमध्ये बहुजनांना संपवण्याचा घाट', माजी खासदाराचा हल्लाबोल
या बैठकीत दिल्ली येथून खासदार छत्रपती संभाजीराजे, ॲड दिलीप तौर, औरंगाबादहून एम एम तांबे, अहमदनगर बाळासाहेब सराटे यांनी संवाद साधला. तर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे, राजेंद्र कुंजीर, विरेंद्र पवार (मुंबई) संजीव भोर (अहमदनगर), अंकुश कदम (नवी मुंबई) , विनोद साबळे (रायगड), राजन घाग (मुंबई) , तुषार जगताप , गणेश कदम (नाशिक), दिलीप पाटील (कोल्हापूर), माऊली पवार, रवी मोहीते (सोलापूर), गंगाधर काळकुटे (बीड), रवी सोडतकर (औरंगाबाद), डॉ. संजय पाटील (सांगली), रूपेश मांजरेकर (मुंबई), किशोर मोरे, दशहरी चव्हाण तसेच अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.