बारामती, 31 मे : बारामतीत जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या पतीवर गोळीबार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बारामतीतील जिल्हा परिषद सदस्यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाला आहे. माळेगाव येथे झाला गोळीबार झाला आहे. या घटनेनंतर रविराज तावरे यांना उपचारासाठी बारामती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एका अज्ञात इसमाने तालुक्यातील माळेगाव येथे हा गोळीबार केला आहे. या प्रकारानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीतील तालुक्यातील माळेगावयेथे ऑडीमध्ये जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे हे संभाजीनगर या ठिकाणी वडापाव घेण्यासाठी थांबले असताना मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार केला, अशी माहिती समोर आली आहे. रविराज तावरे यांना जखमी अवस्थेत बारामती हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. त्यांना फुप्फुसांमध्ये एक गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे ही वाचा-
महत्त्वाची बातमी! 1 जूनपासून राज्यात नवे नियम, पाहा तुमच्या जिल्ह्यात किती सूट?
गोळीबार का केला याचा तपास बारामतीचे पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर हे करीत आहेत. या प्रकारानंतर रुग्णालयातबाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.