मुंबई, 31 मे : 1 जूनपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन असून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याचं जाहीर केलं. असं असलं तरी काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे शिथिलता येणार आहे. मात्र ज्या जिल्ह्यातील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणं शक्य झालेलं नाही तेथे मात्र नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे.
सातारा
सातारा जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन 8 जून पर्यत वाढवला
किराणा दुकाने, बेकरी, मटण, चिकन शॉप, हॉटेल राहणार बंद
पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच मिळणार पेट्रोल
जिल्हयातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढले आहेत.
नागपूर
आज पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये नागपूरमध्ये पुढील 15 दिवसांचे नियोजन करण्याचे घोषित करण्यात आले. यामध्ये नागपूरमधील पुढील पंधरा दिवसाचे नियोजनही शासनाच्या नियमाप्रमाणेच राहील. यामध्ये प्रामुख्याने सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू असतील, यापूर्वी ही दुकाने ७ ते ११ या काळात सुरु होती. मात्र मॉल बंद असेल.
जीवनावश्यक वस्तू सोडून (नॉन ऐसेन्सियल, स्टॅड अलोन ) अर्थात एकटी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. शनिवार, रविवार फक्त अत्यावश्यक दुकाने सुरू असतील. या दोन दिवसात कडक निर्बंध राहतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 सुरू असतील. खाद्य पदार्थ, मद्य- ई कॉमर्स व आवश्यक सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री 11 पर्यंत सुरू राहील. मार्निंग वॉक, आऊट डोअर स्पोर्टस बंद असेल. सर्व सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थितीत सुरू असेल. सर्व खाजगी कार्यालये बंद असतील. सबळ कारणाशिवाय दुपारी 3 नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील. दुकाने सकाळी सात ते दोन पर्यंत सुरू असतील, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा-पुण्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल; जाहीर केले नवे नियम, पाहा काय सुरू आणि काय बंदवाशिम
जिल्ह्यात लॅाकडाऊनच्या नियमांत शिथीलता
1 जून पासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार सर्व प्रकारची दुकाने
शनिवार आणि रविवार हे दोन दिवस केवळ अत्यावश्यक दुकानचं राहणार 7 ते 2 वाजे पर्यंत खुली...
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांचे आदेश
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात 2 जून ते 8 जून पासून कडक लॉकडाऊन.
रत्नागिरी जिल्ह्यात कोणालाही प्रवेश करता येणार नाही.
केवळ अंत्यसंस्कार वैद्यकीय आणीबाणी यासाठी जिल्ह्यात प्रवेश करता येईल.
यासाठी 48 तासापूर्वीच सर्टिफिकेट हवं त्याचप्रमाणे मेडिकल दुकाने आरोग्यविषयक सेवा व आरोग्यविषयक अस्थापना पूर्ण वेळेत सुरू राहतील.
या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे दुकान आस्थापना पूर्ण बंद राहतील.
दूध व किराणामालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा देण्याची सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे .
जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिले रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉक डाऊनचे आदेश
नांदेड
कोरोना रुग्णाचा पॉझिटीव्ह दर कमी असल्याने नांदेड जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहीमेतून काही अंशी सूट मिळणार आहे.
नांदेड जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. पण गेल्या एक महिन्यांपासून रुग्णसंख्या नियंत्रित आहे. सध्या नांदेड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह दर साडे चार टक्के इतका आहे. शिवाय मृत्यूदर देखील कमी झाला आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्देशानुसार आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी नवीन आदेश काढले. त्यानुसार नांदेड जिल्हायत सर्व व्यवहार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत न मोडण्याऱ्या दुकानांना देखील सूट देण्यात आली. मॉल आणि शॉपिंग सेंटर मात्र बंद राहतील. कृषि विषयक सेवाना सायंकाळळी सात वाजेपर्यंत मुभा आहे. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटला घरपोच सेवा देण्याची मुभा आहे. लग्न, अंत्यसंस्कार, राजकिय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना पूर्वी प्रमाणे मर्यादित संख्येची अट आहे. दरम्यान नांदेड मध्ये गेल्या 24 तासात 153 पॉझिटीव्ह तर एकाचा मृत्यू झाला आहे.
परभणी
1 जून ते 16 जून पर्यंत आदेश
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, किराणा, फळ विक्री, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू
शनिवारी आणि रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद
कृषी निविष्ठा आणि शेतीशी निगडित सर्व सेवा, पूर्ण आठवडा सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत राहणार सुरू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.