मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

बाळूमामा फेम मनोहर भोसले अखेर आले समोर, शरद पवारांच्या भेटीवर दिलं स्पष्टीकरण

बाळूमामा फेम मनोहर भोसले अखेर आले समोर, शरद पवारांच्या भेटीवर दिलं स्पष्टीकरण

 'मी बाळूमामाचा वंशज नाहीच आहे, मी बाळूमामाचा भक्त आहे. त्यामुळे गावातील लोकांनी केलेले आरोप खोटे आहेत'

'मी बाळूमामाचा वंशज नाहीच आहे, मी बाळूमामाचा भक्त आहे. त्यामुळे गावातील लोकांनी केलेले आरोप खोटे आहेत'

'मी बाळूमामाचा वंशज नाहीच आहे, मी बाळूमामाचा भक्त आहे. त्यामुळे गावातील लोकांनी केलेले आरोप खोटे आहेत'

पुणे, 31 ऑगस्ट : बाळूमामा (Balumama ) यांचे वंशज म्हणून घेणारे मनोहर मामा भोसले ( Manohar mama Bhosale) गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन  'मी कुठेही फरार झालो नव्हतो. तिरुपतीला गेलो होतो. आज आपल्यासमोर आहे, माझ्यावरील सर्व आरोप तथ्यहीन आहे' असं स्पष्टीकरण मनोहर भोसले यांनी दिले. तसंच, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या भेटीबद्दलही खुलासा केला.

मनोहर मामा भोसले यांच्यावर बारामतीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. त्यांच्यावर 40 लाखांचे रो हाऊस घेण्याचा आरोप करण्यात आला असून तशी तक्रार दाखल आहे. आज पत्रकार परिषद घेऊन मनोहर भोसले (Manohar mama Bhosale Press conference) यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

VIDEO - 'मला माझ्या बायकोपासून वाचवा', नवऱ्याने ढसाढसा रडत मांडली व्यथा

'मी कुठेही फरार झालो नव्हते. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. पण माझी अकारण बदनामी सुरू आहे. बदनामी करणाऱ्यांविरुद्ध 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असं भोसले यांनी सांगितलं.

तसंच, 'मी बाळूमामाचा वंशज नाहीच आहे, मी बाळूमामाचा भक्त आहे. त्यामुळे गावातील लोकांनी केलेले आरोप खोटे आहेत. माझी स्वत:ची शेती आहे, माझ्याकडे गोकुळ दुधाची एजेंसी आहे, मालिकांसाठी मार्गदर्शन करतो यातून माझ्याकडे इतकी संपत्ती आली आहे' असंही भोसले म्हणाले.

"बेटा जग जिंकून घे" मुलाच्या 15व्या वाढदिवसानिमीत्त महेशबाबूची भावनिक पोस्ट

'मी ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून लोकांचे भविष्य सांगतो. मी कुठल्याही प्रकारची बुवाबाजी करत नाही. खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो. याव्यतिरिक्त त्यांचे माझे संबंध नाहीत, असंही भोसले यांनी स्पष्ट केलं.

गावातील भावकी तसंच पार्किंगच्या वादातून माझ्यावर आरोप होत आहेत. पण, हे सर्व आरोप खोटे आहे, त्यात काहीही तथ्य नाही, असा दावाही भोसले यांनी केला.

First published: