जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - 'मला माझ्या बायकोपासून वाचवा', पत्नी पीडित नवऱ्याने ढसाढसा रडत मांडली आपली व्यथा

VIDEO - 'मला माझ्या बायकोपासून वाचवा', पत्नी पीडित नवऱ्याने ढसाढसा रडत मांडली आपली व्यथा

VIDEO - 'मला माझ्या बायकोपासून वाचवा', पत्नी पीडित नवऱ्याने ढसाढसा रडत मांडली आपली व्यथा

आपल्याला न्याय मिळावा यासाठी पत्नी पीडित पती पोलिसांकडे धावत आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 31 ऑगस्ट : नवरा-बायकोतील (Husband wife) भांडणं तशी नवीन नाहीत. अनेकदा हे वाद विकोपाला जातात. नवरा बायकोचा छळ करत असल्याची बरीच प्रकरणं समोर येतात. अशा किती तरी पती पीडित महिला आहेत. पण आता एका पत्नी पीडित नवऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो मला माझ्या बायकोपासून वाचवा असं सांगत, ढसाढसा रडत न्याय मागतो आहे (Wife beating Husband). उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) ललितपूरमधील (Lalitpur) ही घटना आहे. भदैयापुरातील हा रहिवाशी आहे. ब्रजेश कुशवाहा असं या व्यक्तीचं नाव आहे.

पत्नी पीडित पती न्यायायासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचला. त्याने आपल्या बायकोवर मारहाणीचा आणि आपल्याला खोट्या आरोपात अडकवल्याची तक्रार केली आहे. हे वाचा -  प्रेमाचा झांगडगुत्ता: पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीची गर्लफ्रेंड आले आमनेसामने व्हिडीओत ऐकू शकता, ही व्यक्ती आपली बायको आपल्याला खायला देत नाही, खूप मारते, पोलिसांकडून मार खायला लावते. कमाईचे सर्व पैसे हिसकावून घेते. अशी तक्रार करताना दिसतो. रडत रडत तो आपली व्यथा मांडताना दिसतो आहे. आपल्याला न्याय हवा आहे, नाहीतर आपण अशा अत्याचाराने आपल्याला मरण येईल, असंही तो सांगताना दिसतो आहे. हे वाचा -  VIDEO- पाय धरून अख्खा खिसाच कापला; नवरीकडून पाया पडून घेणं नवरदेवाला पडलं महागात बायकोच्या छळाला वैतागलेल्या या नवऱ्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात