Home /News /entertainment /

"बेटा जग जिंकून घे" मुलाच्या 15व्या वाढदिवसानिमीत्त अभिनेता महेशबाबूनं शेअर केली भावनिक पोस्ट

"बेटा जग जिंकून घे" मुलाच्या 15व्या वाढदिवसानिमीत्त अभिनेता महेशबाबूनं शेअर केली भावनिक पोस्ट

महेशबाबू यांनी आपल्या मुलाला 15 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांच्या हृदयाला हात घातला आहे

    अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि दक्षिणेतला लोकप्रिय (South Indian Popular Star) अभिनेता महेशबाबू (Maheshbabu) यांचा मुलगा गौतम आज, 31 ऑगस्टला 15 वर्षांचा झाला आहे. एरव्ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या महेशबाबू यांनी आपल्या मुलाला 15 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांच्या हृदयाला हात घातला आहे. 'अमर उजाला'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'हॅपी 15 गौतम. तुला वाढताना पाहणं हा माझा सर्वांत मोठा आनंद आहे. माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमच तुझ्या पाठीशी आहेत. प्रगती कर आणि जग जिंकून घे. लव्ह यू!' अशी पोस्ट लिहून महेशबाबू यांनी आपला मुलगा गौतम याच्यासोबत फोटो शेअर केला आहे. सव्वासात लाखांहून अधिक लाइक्स या फोटोला मिळाले असून, तीन हजारांहून अधिक कमेंट्स या फोटोवर आहेत. महेशबाबू आणि मिस इंडिया हा किताब मिळवलेली बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) यांचा विवाह 2005 साली झाला. 15 वर्षांचा गौतम घत्तामनेनी (Gautam Ghattamaneni) हा मुलगा आणि आठ वर्षांची सितारा (Sitara) ही मुलगी आहे. महेशबाबू आपल्या कुटुंबासह हैदराबादमध्ये राहतात. 31 ऑगस्ट 2006 रोजी गौतम घत्तामनेनीचा जन्म झाला. त्याचा जन्म 9 महिने पूर्ण होण्याच्या बराच आधी झाला होता. त्यामुळे डॉक्टर्सनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं होतं. त्याला 10-12 दिवस NICUमध्येही ठेवावं लागलं होतं. आई-वडील म्हणून या परिस्थितीला तोंड देणं नम्रता आणि महेश बाबू यांना खूपच अवघड होतं. तरीही प्रत्येक आई-वडिलांप्रमाणेच त्यांनीही हा कठीण काळ व्यतीत केला. यथावकाश तो बरा झाला आणि त्यांचं टेन्शन दूर झालं. गौतम एक खेळाडू असून, तो बऱ्याचदा क्रिकेट खेळताना दृष्टीस पडतो. हे वाचा - मराठी कार्यक्रमात सहभागी होणार लेक म्हणून माधुरीची आई आनंदाने भारावली महेशबाबू यांनी 1983 साली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि ते लवकर लोकप्रिय झाले. त्यांच्या सिनेमांनी रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजवलं. आज महेशबाबू यांची गणना दक्षिण भारतातल्या सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये होते. मुरारी, बॉबी, ओक्काडू, अर्जुन, पोकिरी, भारत अने नेनू, बिझनेसमॅन, स्पायडर अशा अनेक सिनेमांतला त्यांचा अभिनय चाहत्यांना आवडला आहे. त्यामुळे त्यांच्या सिनेमांची चाहते वाट पाहत असतात.
    First published:

    Tags: Birthday celebration, Instagram post, Mahesh babu

    पुढील बातम्या