Home /News /pune /

बारामतीत युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला, गंभीर जखमी अवस्थेत विहिरीत फेकलं

बारामतीत युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला, गंभीर जखमी अवस्थेत विहिरीत फेकलं

युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत विहिरीत फेकले.

बारामती, 10 एप्रिल: लॉकडाऊनच्या काळात शहरात एका अल्पवयीन युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत विहिरीत फेकले. स्थानिक नागरिकांनी वेळीच त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण थोडक्यात बचावले. कैफ सलीम कुरेशी असं जखमी युवकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे. हेही वाचा.. पुण्यातील गणेश पेठेतून 17 जणं ताब्यात, लॉकडाऊन असतानाही नमाजसाठी आले होते एकत्र नेमकं प्रकरण काय? बारामती शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना अरोपी अय्युब गुलाम कुरेशी याने फिर्यादी कैफ सलीम कुरेशीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. आरोपीने कैफ याला शहरातील काटेची विहीरीजवळ नेलं होतं. बाथरूमला जाऊन आलो म्हणून आरोपी थोडा बाजूला गेला. नंतर हळूच येताच कसलाही विचार न करता आरोपीनं त्याच्याजवळ असणाऱ्या धारदार शस्त्राने कैफ याच्या मानेवर सपासप वार केले. एवढं नाही तर कैफ याला गंभीर जखमी अवस्थेत शेजारी असणाऱ्या विहीरीत फेकून दिले. दरम्यान जखमी कैफने आराडाओरड केल्याने येथील नागरीकांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी शहरातील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉ.मोहीते यांनी तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावू शस्त्रक्रिया केली. आत जखमी कैफ यास शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा..सावधान! सोशल मीडियावरील गैरप्रकारांवर बारीक लक्ष, राज्यात 161 गुन्हे दाखल हल्ला करणारा अरोपी अयुब गुलाम कुरेशी यास बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या पथकाने एका तासात अटक केली आहे. हल्ला कशामुळे केला, हे अद्याप समजू शकलं नाही. पुढील तपास पीएसआय योगेश शेलार हे करीत आहेत. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Baramati

पुढील बातम्या