Home /News /maharashtra /

सावधान! सोशल मीडियावरील गैरप्रकारांवर बारीक लक्ष, राज्यात 161 गुन्हे दाखल

सावधान! सोशल मीडियावरील गैरप्रकारांवर बारीक लक्ष, राज्यात 161 गुन्हे दाखल

सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध राज्यात पोलिसांच्या सायबर शाखेने कठोर कारवाई केली आहे.

    मुंबई, 10 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहेत. मात्र, या काळात काही लोक टिकटॉक,फेसबुक,ट्विटर व अन्य सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवा पसरवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध राज्यात पोलिसांच्या सायबर शाखेने कठोर कारवाई केली आहे. पोलिसांना आतापर्यंत 161 गुन्हे दाखल केले आहेत. हेही वाचा..7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करुन देशसेवा करतायेत पती-पत्नी गुन्हेगार व समाजकंटकांना पकडण्यासाठी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय करत आहे. तसेच टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर पोलिस बारीक लक्ष ठेऊन आहेत. मुंबई पोलिसांचा नवा आदेश जारी दरम्यान, महराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण, त्याहून चिंतेची बाब म्हणजे सोशल मीडियावरून चुकीचे मॅसेज पसरवले जात आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहे. हेही वाचा..संचारबंदीचं उल्लंघन, शरद पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यासह 30 जणांवर गुन्हा मुंबई पोलील शहर पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी एक पत्रक काढले आहे. या पत्रकानुसार, एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जर कुणी कोरोनासंदर्भात चुकीचा मॅसेज पाठवला तर त्यासाठी अ‍ॅडमिनलाच जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे अ‍ॅडमिनने ग्रुप लॉक करून सर्व अधिकार आपल्याच ताब्यात घेतले पाहिजे, अशी स्पष्ट सूचना मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. 10 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत हे पत्रक लागू राहणार आहे. चुकीचे मेसेजेस, अफवा पसरू नये, म्हणून मुंबई पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे. त्यासोबतच ट्विटर, फेसबुक, टिकटॉक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल प्लॅटफॉर्मला देखील हे नियम लागू असणार आहे. हेही वाचा..कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत दिवसभरात 10 दगावले, रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबद्दल सोशल मीडियावर चुकीचे मॅसेज पसरवले जात असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात या प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनसह सदस्यांना अटकही करण्यात आली आहे. परंतु, तरीही काही महाभागांकडून चुकीचे मेसेज पाठवण्याचे प्रकार सुरूच आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या, ध्येयधोरणाच्या विरोधात चुकीचे मेसेज पसरवू नये. कोरोना व्हायरस पसरेल किंवा सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येईल, असे कोणता प्रकार जर आढळून आला तर संबंधित व्यक्ती आणि ग्रुप अ‍ॅडमिनवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. संपादन - संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या