पुणे, 10 एप्रिल : देशभरातून कोरोनाबाधितांची (Corornavirus) संख्या वाढत आहेत. सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनचं (Lockdown) पालन करणं यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे. मात्र वारंवार लोकांकडून लॉकडाऊनचं उल्लंघन केलं जात आहे. यासंदर्भात पुण्यातील (Pune Ganesh Peth) गणेश पेठेत अशीच एक घटना घडली आहे.
राज्याच्या पोलिसांकडून लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. त्यात पुण्यातील गणेश पेठेतील एका धार्मिक स्थळावरून 17 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. लॉकडाऊन असतानाही हे नागरिक नमाजसाठी एकत्र आल्याची माहिती मिळाली आहे. 17 पैकी काही जण हे मुळचे रांचीचे रहिवासी आहेत तर 4 जण स्थानिक आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्वांना कोरोना चाचणीसाठी नायडू रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पुणे पोलिसांची आक्रमक कारवाई केली आहे. सध्या पुण्यातील भवानी पेठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तरीही आरोग्य सर्वेक्षणसाठी स्थानिकांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. एकट्या भवानी पेठेत आतापर्यंत 47 कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या पालिका आरोग्य विभागाकडून जोरदार आरोग्य तपासणी केली जात आहे. मुंबई - पुण्यातील कोरोनाबाधिकांची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
संबंधित - 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करुन देशसेवा करतायेत पती-पत्नी
कोरोनाच्या लढ्यात भारताला 'ADB'चा हात, 16 हजार 700 कोटींच्या मदतीची घोषणा
संकलन, संपादन - मीनल गांगुर्डे