जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / राज्यातील प्राणी संग्रहालयात तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू, सर्वाधिक मृत्यू राणीच्या बागेत, अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

राज्यातील प्राणी संग्रहालयात तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू, सर्वाधिक मृत्यू राणीच्या बागेत, अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

धक्कादायक ! प्राणी संग्रहालयांमधील तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू सर्वाधिक मृत्यू राणीच्या बागेत

धक्कादायक ! प्राणी संग्रहालयांमधील तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू सर्वाधिक मृत्यू राणीच्या बागेत

Around 200 animals death in Maharashtra’s Zoo: प्राणी संग्रहालयांमध्ये प्राण्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होतंय का?  असा प्रश्न या आकडेवारीमुळे विचारला जाऊ लागलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    पुणे, 19 नोव्हेंबर : केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला (सेंट्रल झू अ‍ॅथोरिटी) (Central Zoo Authority) सादर केलेल्या वार्षिक अहवालानुसार 2019-20 या वर्षभराच्या कालावधीत देशभरातील प्राणी संग्रहालयातील तब्बल 200 च्या घरात प्राण्यांचे विविध आजारांनी मृत्यू झाले (around 200 animals died in Maharashtra’s various Zoo) आहेत. देशात 513 तर महाराष्ट्रात 56 प्राणीसंग्रहालये आहेत. यासर्वांचे कामकाज केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या अंतर्गत सुरू असते. त्यापैकी 12 प्रमुख प्राणीसंग्रहालयांनी त्यांच्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल प्राधिकरणाला सादर केला आहे. या सादर केलेल्या अहवालांमधूनच प्राण्यांच्या मृत्यूंची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक मृत्यू राणीच्या बागेत मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयामध्ये (राणीची बाग) (Veermata Jijabai Bhosale Udyan, Rani baug) राज्यात सर्वात जास्त प्राण्यांचे मृत्यू झाले आहेत. येथील मृत प्राण्यांची संख्या 67 असून, दुसरा क्रमांक वर्ध्यातील ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल’ या प्राणी संग्रहालयाचा आहे. येथील मृत प्राण्यांची संख्या 53 आहे. तर तिसरा क्रमांक पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा लागतो. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 2019-20 या कालावधीत 35 विविध प्रकारच्या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. वाचा :  पुण्यातील तब्बल 800 शाळा अंधारात, वीजबिल न भरल्याने शाळांचा वीज पुरवठा खंडित मृत प्राण्यांमध्ये सर्वाधिक संख्या हरिणांची आहे. राज्यातील प्राणीसंग्रहालयात होणार्‍या प्राण्यांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक संख्या विविध प्रकारच्या हरिणांची आहे. हरिण हा प्राणी मुळातच भित्रा. त्यांच्या मृत्यूची कारणे सुध्दा प्राणी संग्रहालय प्रशासनांनी हृदयविकाराच्या धक्क्यानेच झाली असल्याची दिली आहेत. तर इतर प्राणी वय झाल्यामुळे आणि जखमांमुळे झालेल्या जिवाणूंच्या संसर्गाने (बॅक्टीरिया) इन्फेक्शनमुळे झाल्याचे प्राणी संग्रहालय प्रशासनांकडून सांगण्यात आले आहे. प्राण्यांच्या मृत्यूची कारणे कोणती? हृदयविकाराचा धक्का रक्तश्रावी शॉक म्हातारपण हिपॅटिक फेलर अनेक अवयव निकामी होणे श्वसनसंस्था निकामी होणे अंतरंग दुखापत, जखमा न्यूमोनियामुळे मृत्यू फॅटी लिव्हरमुळे मृत्यू वाचा :  रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं लुटलं; महिला टीसीनंच घातला लाखोंचा गंडा राज्यातील प्राण्यांच्या मृत्यूची आकडेवारी वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणीबाग) - 67 प्राण्यांचे मृत्यू पीपल्स फॉर अ‍ॅनिमल, वर्धा - 53 प्राण्यांचे मृत् राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज, पुणे - 35 प्राण्यांचे मृत्यू संजय गांधी नॅशनल पार्क आणि प्राणीसंग्रहालय - 12 प्राण्यांचे मृत्यू रेस्क्यू सेंटर गोरेवाडा, नागपूर - 11 प्राण्यांचे मृत्यू निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय, पिंपरी चिंचवड - 03 प्राण्यांचे मृत्यू महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय, सोलापूर - 06 प्राण्यांचे मृत्यू महाराजा बाग प्राणीसंग्रहालय, नागपूर - 05 प्राण्यांचे मृत्यू

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: mumbai , pune , Zoo
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात