मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं लुटलं; महिला टीसीनंच घातला लाखोंचा गंडा

पुणे: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं लुटलं; महिला टीसीनंच घातला लाखोंचा गंडा

Crime in Pune: पुण्यातील एका महिला टीसी अधिकाऱ्यानं दुसऱ्या एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपी महिलेनं फिर्यादी महिलेस रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याच्या बहाण्यानं लुबाडलं आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 17 नोव्हेंबर: पुण्यातील (Pune) एका महिला टीसी अधिकाऱ्यानं (Woman TC officer) दुसऱ्या एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक (Money Fraud) केली आहे. आरोपी महिलेनं फिर्यादी महिलेस रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याच्या बहाण्यानं (Lure of job in railway) लुबाडलं आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेनं निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विविध कलमाअंतर्गत महिला टीसी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या प्रकरणी आरोपी महिलेस अटक केली असून घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

संजीवनी पाटणे असं गुन्हा दाखल झालेल्या 25 वर्षीय महिला टीसी अधिकाऱ्याचं नाव आहे. तर सुमित्रा हुले असं फसवणूक झालेल्या 32 वर्षीय महिलेचं नाव आहे. फिर्यादी सुमित्रा हुले यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. याठिकाणीच फिर्यादीची आरोपीशी महिलेशी ओळख झाली होती. दरम्यान संशयित आरोपी संजीवनी यांनी आपण रेल्वेत टीसी म्हणून कार्यरत असल्याची माहिती सुमित्रा यांना दिली होती. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती.

हेही वाचा-पुणे: 4 लाख वसूल करण्यासाठी तरुणाचं अपहरण; बेदम मारहाण करत 1 लाख लुटले

आरोपी महिला फिर्यादीशी जेव्हा जेव्हा भेटायच्या तेव्हा नोकरी संदर्भातील गप्पा मारायच्या. दरम्यान, आरोपी संजीवनी यांनी सुमित्रा यांना आणि त्यांच्या भावाला रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं. नोकरी देण्याचं आश्वासन देत आरोपी महिलेनं सुमित्रा यांचा विश्वास संपादन केला. तसेच रेल्वेत टीसीची नोकरी लावण्यासाठी सुमित्रा यांचे आणि त्यांच्या भावाचे असे एकत्रित साडेआठ लाख रुपये घेतले.

हेही वाचा-सासरच्या छळानं घेतला बापलेकीचा जीव;पित्याच्या आत्महत्येनंतर मुलीनंही सोडला प्राण

साडेआठ लाख रुपये घेऊनही दोघातील एकालाही नोकरी लागली नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, सुमित्रा यांनी निगडी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी संजीवनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित महिला टीसी अधिकारी संजीवनीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Money fraud, Pune