Home /News /pune /

पुणे तिथे काय उणे! 20 किमीपर्यंत मोफत रुग्णवाहिका सेवा, शहरात होतंय कौतुक

पुणे तिथे काय उणे! 20 किमीपर्यंत मोफत रुग्णवाहिका सेवा, शहरात होतंय कौतुक

सामाजिक कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तीन रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत 20 किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भागात ते मोफत सेवा या माध्यमातून उपलब्ध करून देतात.

    पुणे, 26 एप्रिल : कोरोना विरोधातील लढ्यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक आहेत ते या संकटाशी थेट दोन हात करणारे कोरोना योद्धे (corona warriors). डॉक्टर, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचा यात समावेश होतो. आणखी एक असाच महत्त्वाचा घटक म्हणजे कोरोना रुग्णांची ने आण करणारे अ‍ॅम्ब्युलन्स चालक. हे संकट सुरू झाल्यापासून अ‍ॅम्ब्युलन्स चालक (Ambulance driver) अविरत सेवा देत आहेत. हडसपर येथील एका अ‍ॅम्ब्युलन्स चालकानं तर कर्तव्य बजावतानाच तीन रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून देत समाजाप्रती असलेलं कर्तव्यही पार पाडलं आहे. (वाचा-Corona संकटात 'या' विमान कंपनीची खास ऑफर, डॉक्टर आणि नर्सना हवाई प्रवास मोफत) पुण्याच्या हडपसर भागातील हम्पलिंग भद्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णवाहिका सेवा देतात. जीवनरक्षा या संस्थेच्या माध्यमातून ते रुग्णवाहिका सेवा देतात. भद्रे हे स्वतः रुग्णवाहिका चालकही आहेत. त्यामुळं वर्षभरापासून ते कोरोनाच्या रुग्णांची ने-आण करत त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. पण त्याचबरोबर सामाजिक कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तीन रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत 20 किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भागात ते मोफत सेवा या माध्यमातून उपलब्ध करून देतात. (वाचा-तुम्हाला हवी ती Corona vaccine घेता येईल का? सरकारने काय सांगितलं पाहा) रुग्ण स्वतः ठरवतात भाडे भद्रे यांनी 20 किलोमीटरच्या अंतरापर्यंत मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. पण काही रुग्ण हे भाडं द्यायला तयार असतात किंवा अंतर जास्त असेल तर भाडं आकारलं जातं. पण अशावेळी देखील रुग्ण स्वतःच किती भाडं द्यायचं हे ठरवतात. 23 मेपर्यंत ते मोफत रुग्णवाहिकेची सेवा देणार आहेत. कोरोनाच्या काळात अनेक कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची स्थिती अगदी जवळून पाहिली आहे. अशा संकटाच्या काळात आपल्याकडून थोडा जरी आधार अशांना मिळावा यासाठी भद्रे हा उपक्रम राबवत आहेत. त्यासाठी संपूर्ण हडपरसर परिसराबरोबरच पुण्यातही त्यांचं कौतुक होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या