तुम्हाला हवी ती Corona vaccine घेता येईल का? सरकारने काय सांगितलं पाहा

तुम्हाला हवी ती Corona vaccine घेता येईल का? सरकारने काय सांगितलं पाहा

Corona Vaccination : तुम्ही पैसे देऊन कोरोना लस घेणार आहात. पण तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये किंवा हवी ती कोरोना लस घेता येईल का?

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : सध्या केंद्र केंद्र सरकारमार्फत 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण (Corona vaccination) केलं जात आहे. त्यानुसार सरकारी लसीकरण (Covid 19 vaccination) केंद्रात मोफत आणि खासगी रुग्णालयात पैसे घेऊन लस (Corona vaccine) दिली जात आहे. पण तुम्हाला लस (Covid 19 vaccine) निवडण्याची मुभा नाही. 1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादक कंपन्या एका विशिष्ट किंमतीला लस देतील. काही राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. पण तुम्ही खासगी रुग्णालयात लस घेतली तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. पण मग तुम्हाला हवी ती कोरोना लस घेता येईल का?असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

कोरोना लसीकरण केंद्र सरकारमार्फत असो, राज्य सरकारमार्फत असो किंवा खासगी रुग्णालयांमार्फत. कोविन पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्यामुळे 18 पेक्षा जास्त नागरिकांना ज्यांना कोरोना लस घ्यायची आहे, त्यांनासुद्धा नोंदणी करावी लागेल. 28 एप्रिलपासून ही नोंदण प्रक्रिया सुरू होईल. ही नोंदणी करताना तुम्हाला कोरोना लस, त्याची किंमतही दिसेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती लस हवी हे तुम्हाला निवडता येईल.

हे वाचा - पुण्यात महिलांपेक्षा पुरुषांवर भारी पडतोय कोरोना; वर्षभरातील बळींमध्ये 67% पुरुष

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र दिलं आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार खासगी केंद्रातील लसीकरणाची नोंदणीही ऑनलाइन माध्यमातून कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेत अॅपमार्फतच होईल. प्रत्येक खासगी लसीकरण केंद्रांना त्यांच्या लशीचा प्रकार, किंमत आणि लशीची उपलब्ध याबाबत कोविन पोर्टलवर माहिती द्यायची आहे. त्यानुसार कोविन पोर्टलवर बदल केले जात आहेत. लशीचा प्रकार आणि त्याची किंमत कोविन पोर्टलवर उपलब्ध असेल तर लोक नोंदणी करताना आपल्या सोयीनुसार लस निवडतील.

हे वाचा - या चार राज्यांमध्ये 1 मेपासून नाही सुरू होणार लसीकरण, सांगितलं कारण

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्डची किंमत राज्य सरकारसाठी प्रति डोस  400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये आहे.

Published by: Priya Lad
First published: April 26, 2021, 4:30 PM IST

ताज्या बातम्या