नवी दिल्ली, 26 एप्रिल : देशात वाढलेल्या कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) देशांतर्गत प्रवासाची सुविधा देणाऱ्या एअरलाईन्स कंपनीनं एक खास ऑफर सुरु केली आहे. डॉक्टर आणि नर्ससाठी (Doctors and Nurses) ही ऑफर असून त्यांना देशभर मोफत विमान प्रवास करता येणार आहे. Vistara कंपनीची ही ऑफर आहे. त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचि उषा पाध्ये (Usha Padhee) यांना याबाबत पत्र लिहून या ऑफरची माहिती दिली आहे. या संकटाच्या काळात कोरोना योद्ध्यांना सर्व प्रकारच्या सोयी मिळतील याची काळजी घेणार असल्याचं आश्वासन कंपनीनं दिलं आहे.
उषा पाध्ये यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. "विस्तारा कंपनी सरकारी संस्था आणि हॉस्पिटलच्या तातडीची गरज भागवण्यासाठी हवाई प्रवासाची सुविधा देण्यास तयार आहे. त्याचबरोबर कंपनीनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व डॉक्टर आणि नर्सना मोफत हवाई प्रवासाचा प्रस्ताव दिला आहे. आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करुया.'' असं आवाहन पाध्ये यांनी केलं आहे.
विमान कंपनीनं कोरोना योद्ध्यांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी नेण्यासोबतच परत आणण्याची जबाबदारी देखील घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. डॉक्टर आणि नर्सना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आमची मदत झाली तर आम्हाला आनंद होईल, असं विस्तारा कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
या प्रकारच्या जागा मर्यादीत असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (First come first) या आधारावर सर्व मेडिकल प्रोफेशनल मंडळींना ही सुविधा देण्यात येईल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे.
या चार राज्यांमध्ये 1 मेपासून नाही सुरू होणार लसीकरण, सांगितलं कारण
अन्य कंपन्यांच्याही ऑफर्स
कोरोना संकटात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अन्य विमान कंपन्यांनी देखील आकर्षक ऑफर सुरु केल्या आहेत. स्पाईस जेट (SpiceJet) आणि इंडिगो (IndiGo) विमान कंपनींनी देशांतर्गत तिकीटांची वेळ किंवा तारीख बदलल्यावर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोची कंपनीची ही ऑफ 30 एप्रिलपर्यंत तर स्पाईस जेट कंपनीची 15 मे पर्यंत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus, Covid-19, Spicejet