जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Ambedkar Jayanti 2023 : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्याआधी नक्की पाहा हे वेळापत्रक

Ambedkar Jayanti 2023 : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्याआधी नक्की पाहा हे वेळापत्रक

Traffic Advisory for Ambedkar Jayanti

Traffic Advisory for Ambedkar Jayanti

Traffic Advisory for Ambedkar Jayanti : मुंबई पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनावणे, प्रतिनिधी पुणे, 13 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पीएमपीच्या बस मार्गांतही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हे बदल पाहून घ्या नाहीतर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बदल करण्यात आला आहे. शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली असून, ही वाहतूक आरटीओ चौकातून जहांगीर रुग्णालयाकडे जाईल. जीपीओ चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौक मार्गे जाईल.

“बाबासाहेबांचा वापर केवळ……”, बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकरांचा गंभीर आरोप

पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकात जाणारी वाहतूक अलंकार मार्गे वळवण्यात आली आहे. नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकात जाणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेस मार्गे वळविण्यात आली आहे. बॅनर्जी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पॉवर हाऊस चौकातून नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेस मार्गे वळविण्यात आली आहे.

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 10 अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य

वाहतूक पोलीस प्रशासनाने शहरात येणार्‍या नागरिकांची गर्दी लक्षात घेत, जिल्हाधिकारी परिसर, अरोरा टॉवर परिसर, विश्रांतवाडी चौक, दांडेकर पूल (सिंहगड रस्ता) या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

दुसरीकडे मुंबईतही चैत्यभूमीकडे जाण्यासाठी गर्दी लक्षात घेता मुंबईतही वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्याची माहिती वाहतूक पोलिसांनी ट्विट करून दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात