जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 10 अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 10 अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 10 अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य

डॉ. भीमराव आंबेडकरांनी समाजातील दीनदलितांना समानता आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 एप्रिल : येत्या 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती आहे. आंबेडकर जयंती देशातील सरकारी कार्यालयांमध्ये आणि सर्वसामान्य लोक आपापल्या पद्धतीने साजरी करतात. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव होते. आंबेडकरांचे वडील रामजी वालद मालोजी सकपाळ महू येथे मेजर सुभेदार होते. आंबेडकरांचे कुटुंब मराठी होते आणि ते मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेडकर गावचे होते. आईचे नाव भीमाबाई सकपाळ. बाबासाहेबांना प्राथमिक शिक्षण मिळवण्यातही अडचणी आल्या, पण या सर्व परिस्थितीला न जुमानता आंबेडकरांनी केवळ उच्च शिक्षण घेतले नाही तर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्रीही झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले होते. डॉ. भीमराव आंबेडकरांनी समाजातील दीनदलितांना समानता मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे असे 10 विचार जाणून घेऊया जे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणात प्रेरणा देतील. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 अमूल्य विचार 1. मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. 2. मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मापन त्यानुसार करतो जितकी तिथल्या महिलांनी प्रगती केली असेल. 3. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. 4. शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा. 5. धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही. 6. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची गरज असते, जसे वनस्पतीला पाण्याची गरज असते, अन्यथा कोमेजून मरते. 7. महापुरुष हा प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असा असतो की, तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो. 8. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ती एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारली पाहिजे. 9. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. 10. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ते एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारले पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात