जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणेकरांना दिलासा! मिळणार 'ही' सूट, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दररोज उघडणार दुकानं

पुणेकरांना दिलासा! मिळणार 'ही' सूट, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दररोज उघडणार दुकानं

पुणेकरांना दिलासा! मिळणार 'ही' सूट, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दररोज उघडणार दुकानं

लॉकडाऊन 4 ची केंद्र आणि राज्याची नियमावली जाहीर झाल्यानंतर पुण्यात आता केवळ 3 टक्के क्षेत्र हे प्रतिबंधित उरलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 20 मे: लॉकडाऊन 4 ची केंद्र आणि राज्याची नियमावली जाहीर झाल्यानंतर पुण्यात आता केवळ 3 टक्के क्षेत्र हे प्रतिबंधित उरलं आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दुकानं, व्यवसाय सुरू व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. सोने चांदीची दुकानं, मौल्यवान धातू विक्रीची दुकानं, शेती विषयक अवजार विक्री, छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स विक्रीची दुकानं दररोज उघडणार आहेत. मात्र, मॉल, रिक्षा, कॅब, सीटी बसेस, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे बंदच राहणार आहेत. हेही वाचा..  बापरे! परवानगीला लागले तब्बल 5 दिवस, नातेवाईकांना ताब्यात मिळाला कुजलेला मृतदेह सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेन्मेंट क्षेत्रात।मात्र फक्त जीवनावश्यक सुविधा सुरू राहतील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरेलू कामगारांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रमुख रस्ते, चौक सोडून काही ठिकाणी पथारी व्यवसाय करण्यासही मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी लॉकडाऊनचे वेगळे नियम असणार आहेत. एवढेच काय तर आयटी कंपन्याही सुरु होणार आहेत. याशिवाय पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रांसाठी जीवनावश्यक वस्तुंच्या दुकांनासह या क्षेत्राबाहेरील बहुतांश व्यवहार आजपासून( 20 मे) सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूनक व्यवस्था बंद राहणार आहेत. याशिवाय मॉल, मल्टीप्लेक्स, हॉटेल, सलून, ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात बँका, सरकारी कार्यालये, आयटी कंपन्या, बांधकाम सुरु होतील. विशेष म्हणजे काही रस्ते वगळता बहुतांश परिसरात काही व्यावसायिकांनाही परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना विशेषत: नागरिकांना रस्त्यावर येण्यास बंदी आहे. ज्या भागातील सोसायट्यामध्ये रुग्ण आढळतील अशा सोसायट्या सील करण्यात येतील, असे निर्देश महापालिकेने दिले आहेत. याकडे जे कानाडोळा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हेही वाचा.. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला, एका तासाला एक रुग्णांचा मृत्यू दररोज उघडणारी दुकानं… - सोने चांदीची दुकानं - मौल्यवान धातू विक्रीची दुकानं - शेती विषयक अवजार विक्री, - छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स विक्रीची दुकानं सोमवार, बुधवार, शुक्रवारी उघडणारी दुकानं - इलेक्ट्रॉनिक साधनं - संगणकीय साहित्य, - मोबाईल दुरुस्ती विक्री - भांडी विक्री - इस्त्री - स्टेशनरी - वैद्यकीय साहित्यासाठीचा कच्चा माल - फोटो स्टुडिओ - शिलाईची दुकानं - चष्मा विक्री मंगळवार, गुरुवार,शनिवार, रविवारी उघडणारी दुकानं - वाहन विक्री - सायकल दुरुस्ती विक्री - वाहन दुरुस्ती - हार्ड वेअर - प्लम्बिंग - बांधकाम साहित्य - डेअरी - पूजा साहित्य - फर्निचर - सोने चांदीची दुकानं - मौल्यवान धातू विक्रीची दुकानं - शेती विषयक अवजार विक्री - छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स विक्रीची दुकानं सोमवार, बुधवार, शुक्रवारी उघडणारी दुकानं - इलेक्ट्रॉनिक साधनं - संगणकीय साहित्य - मोबाईल दुरुस्ती विक्री - भांडी विक्री - इस्त्री - स्टेशनरी - वैद्यकीय साहित्यासाठीचा कच्चा माल - फोटो स्टुडिओ - शिलाईची दुकानं - चष्मा विक्री मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारी उघडणारी दुकानं - वाहन विक्री - सायकल दुरुस्ती विक्री - वाहन दुरुस्ती - हार्ड वेअर - प्लम्बिंग - बांधकाम साहित्य - डेअरी - पूजा साहित्य - फर्निचर दरम्यान, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात सध्या चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरु झाला आहे. लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यात धर्तीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही लॉकडाऊनबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या लॉकडाऊनमधील नवीन नियमावली राज्यसरकारने केली जाहीर. राज्यात आता तीन झोन केले आहेत. यात 1) कंटेनमेंट झोन, 2) रेड झोन, 3) नॉन रेड झोन असतील. ही नियमावली मुंबई, नवी मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती हे परिसर रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान रात्री 7 ते सकाळी 7 दरम्यान कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात