पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला, एका तासाला एक रुग्णांचा मृत्यू

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला, एका तासाला एक रुग्णांचा मृत्यू

राज्यात मुंबईसह पुण्यात कोरोनाने कहर केला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मंगळवारी 10 जणांचा मृत्यू झाला

  • Share this:

पुणे, 20 मे: राज्यात मुंबईसह पुण्यात कोरोनाने कहर केला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मंगळवारी 10 जणांचा मृत्यू झाला, यापैकी 8 कोरोना रुग्ण पुण्यातील तर 2 पिंपरी चिंचवडमधील होते. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या 226 वर पोहोचली आहे.

मंगळवारी जिल्ह्यात 193 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4370 वर पोहोचला आहे.  त्याचबरोबर 110 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे पुण्यातील बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 1910 झाली आहे. पिंपरी चिंचवड मधील 132 रुग्णही बरे झाले आहेत.

हेही वाचा.. मोठी बातमी! पुणेकरांसाठी लॉकडाऊनचे वेगळे नियम, आजपासून सुरु होणार व्यवहार

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी, कुठे किती रुग्ण

– पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 4370

– पुणे शहरातील रुग्णांची संख्या : 3,517

– पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या : 199

पुणे ग्रामीण रुग्णांची संख्या : 100

पुणेकरांसाठी लॉकडाऊनचे वेगळे नियम..

लॉकडाऊन 4 ची केंद्र आणि राज्याची नियमावली जाहीर झाल्यानंतर पुण्यात आता केवळ 3 टक्के क्षेत्र हे प्रतिबंधित उरलं आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दुकाने, व्यवसाय सुरू व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मॉल, रिक्षा, कॅब, बसेस केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा हे बंदच राहणार आहेत.

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेन्मेंट क्षेत्रात।मात्र फक्त जीवनावश्यक सुविधा सुरू राहतील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरेलू कामगारांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रमुख रस्ते ,चौक सोडून काही ठिकाणी पथारी व्यवसाय करण्यासही मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा.. होम क्वारंटाइन व्यक्तिचा संशयास्पद मृत्यू, PPE किट नसल्याने मृतदेह रस्त्यावर

व्यवसायाचे दिवस निश्चित...

-रोज उघडणारी दुकाने-सोने चांदी ,मौल्यवान धातू विक्रीची दुकानेशेती विषयक औजार विक्री,छत्री रेनकोट प्लास्टिक शीट्स विक्रीची दुकाने.

- सोमवार, बुधवार, शुक्रवारी उघडणारी दुकाने-elecrtronic साधने, संगणकीय साहित्य, मोबाईल दुरुस्ती विक्री, भांडी विक्री, इस्त्री, स्टेशनरी, वैद्यकीय साहित्यासाठीचा कच्चा माल, फोटो स्टुडिओ, शिलाई दुकाने, चष्मा विक्री.

मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी उघडणारी दुकाने-वाहन विक्री, सायकल दुरुस्ती विक्री, वाहन दुरुस्ती, हार्ड वेयर,प्लम्बिंग,बांधकाम साहित्य,डेअरी ,पूजा साहित्य, फर्निचर.

First published: May 20, 2020, 8:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading