• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर अजित पवारांचं मोठ विधान, उद्धव ठाकरेंबद्दल म्हणाले...

मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर अजित पवारांचं मोठ विधान, उद्धव ठाकरेंबद्दल म्हणाले...

आम्ही तिन्ही पक्ष एकत्र जरी आलो असलो तरी पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.

  • Share this:
पुणे, 15 जून: महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) मुख्यमंत्रिपदावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालं आहे. 5 वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहणार असं शिवसेनेनं (Shivsena) बजावलं आहे तर काँग्रेसनेही (Congress) त्याला सहमती दर्शवली आहे. पण, 'सध्यातरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवायचं ठरलं आहे. नानांनी (Nana Patole) त्यांची भूमिका व्यक्त केली आहे', असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी यांनी कोरोना परिस्थिती, वारी आणि महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर आपले मत व्यक्त केले. 'प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र जरी आलो असलो तरी पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, आणि शरद पवार साहेबांनी एकत्र येत हे सरकार स्थापन केलं आहे, त्यामुळे त्यांनीच याबद्दल निर्णय घेतला आहे, असं म्हणत अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला टोला लगावला. BREAKING : मुंबईतील स्फोटकांनी कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड, 2 जणांना अटक 'काही पक्षीय लोकं वेगळं काहीतरी निष्पन्न व्हावं असं वाटत आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवायचं ठरलं आहे. पाच वर्ष सरकार पूर्ण काम करणार आहे. नाना पटोले यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे' असंही अजित पवार म्हणाले. 'जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. पण भ्रष्टाचाराचा एवढाढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी. नेमका प्रकार घडला कसा याबद्दल खुलासा झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी राम मंदिर गैरव्यवहारावर दिली. 'हे काय घातलंय?'; अभिनेत्रीची आगळीवेगळी फॅशन पाहून चाहतेही बुचकळ्यात, पाहा PHOTO 'कोल्हापूरमध्ये १६ तारखेला मराठा समाजाचे आंदोलन आहे. या आंदोलनात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आंदोलनस्थळी जाणार आहोत. उद्या पालकमंत्री, हसन मुश्रीफ तिकडे जाणार आहे, ते भूमिका मांडणार आहेत.  संभाजीराजेंनी सुद्धा आवाहन केलं आहे की कमीत कमी लोकांनी आंदोलनस्थळी यावं, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे याचे भान सर्वांनी बाळगावे, असंही अजित पवार म्हणाले. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनाबाधितांचा दर 5 टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे पुण्यात अनलॉक करण्यात आले आहे. जर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढली तर कठोर निर्णय घेऊ, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं.
Published by:sachin Salve
First published: