मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

मोठी बातमी, पुण्यातील कोरोना परिस्थितीबद्दल खुद्द अजित पवारांनी केला मोठा खुलासा

मोठी बातमी, पुण्यातील कोरोना परिस्थितीबद्दल खुद्द अजित पवारांनी केला मोठा खुलासा

पुण्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 103812 वर पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

पुण्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 103812 वर पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

पुण्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 103812 वर पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

पुणे, 06 सप्टेंबर : पुण्यातला कोरोनाचाचा प्रादुर्भाव काही केलं थांबायचं नाव घेत नाही. प्रभावी उपाययोजनांचा अभाव, सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे आणि नियमाचे पालन न केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भावाची संख्या वेगाने वाढते आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यातील परिस्थितीबद्दल कबुली दिली आहे.

पुण्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 103812 वर पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन करण्यात आला होता. पण, सतत लागू होत असलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाले. त्यामुळे शहरात लॉकडाउन हटवण्यात आले. अनेक अटी शिथिल करून उद्योग-व्यवसायांना परवानगी देण्यात आली. पण पुण्यातला लॉकडाउन लवकर उठवला ही चूक झाली, अशी कबुलीच पालकमंत्री अजित पवारांनी दिली.

कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर.., संजय राऊतांचे मोठे विधान

'ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत माहीत हे वस्तूस्थिती आहे. अ‍ॅम्ब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे. ससूनचा ऑक्सीजन तुटवडा प्रॉब्लेम झाला म्हणून जम्बोत पेशंट पाठवले. पुण्यात लॉकडाऊन उठवण्यावरून सीएमची वेगळी भूमिका होती पण पुणातील व्यापारी आक्रमक होते म्हणून लॉकडाऊन उठवलं' अशी माहितीही त्यांनी दिली.

पुण्यातला रुग्णवाढीचा आयसीएमआर दिलेल्या मानकापेक्षा जास्त आहे. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर रोजच्या जगण्यातला अविभाज्य भाग बनवणे गरजेचं आहे.

त्याचबरोबर पुण्यातला कोरोनाग्रस्तांचा मृत्युदर चिंतेचा विषय बनला आहे.  मृत्यूदर कमी करण्याचा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

धक्कादायक! चिमुकल्यानं चावलं सापाला, खेळता-खेळता घेतला पंगा

गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर कार्डियाक ॲम्बुलन्स यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनासमोरचे मुख्य आव्हान झाले आहे. अलीकडे रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहे.

तरदुसरीकडे कोरोनावर उपचार करत असताना औषधांचा तुटवडा रोखण्यासाठी साठवणूक करणाऱ्या औषध व्यापाऱ्यांवर  कारवाई करण्याची गरज आहे. याबद्दल प्रशासनानं काय भूमिका घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.

शरद पवारांनीही घेतली आढावा बैठक

विशेष म्हणजे, शनिवारीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेत, अशा सूचना शरद पवार यांनी केल्या. तसंच, 'कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्कशिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा', असं शरद पवार म्हणाले.

First published: