मुंबई, 06 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त भागाशी केल्यामुळे वाद पेटला आहे. शिवसेनेनं राज्यभरात कंगनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले आहे. पण, आता जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर विचार करू अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना कंगना राणावतला महाराष्ट्राची माफी मागावी असे मागणी केली आहे. जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर माफ करण्याबद्दल विचार करू, असं राऊत म्हणाले.
तसंच, कंगनाने मुंबईबद्दल वक्तव्य करण्याची हिंमत केली. हेच तिने अहमदाबादबद्दल बोलून दाखवावे, असा सणसणीत टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला.
If that girl (Actor Kangana Ranaut) will apologise to Maharashtra, then I will think about it (of apologising). She calls Mumbai a mini Pakistan. Does she have the courage to say the same about Ahmedabad?: Shiv Sena MP Sanjay Raut pic.twitter.com/GnUBd0ZTFO
— ANI (@ANI) September 6, 2020
दरम्यान, कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेनं राज्यभरात तिच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन केले. ठिकठिकाणी शिवसैनिकांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करत जोडो मारो आंदोलन केले आहे. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकीच दिली आहे. एवढंच नाहीतर आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले आहे.
कंगनाने विमानतळावर शिवसेना स्टाइल स्वागत
दरम्यान, कंगना राणावतशी व्यक्तिगत भांडण नाही. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा इशाराही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता.
धक्कादायक! चिमुकल्यानं चावलं सापाला, खेळता-खेळता घेतला पंगा
तसंच, 'शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिप्पणी करत असेल तर हा एक पक्षाचा विषय नाही. 11 कोटी जनतेचा विषय आहे. कंगनाला मराठी समजत का? तिनं स्वतःचा ट्विटर हँडल स्वतः हँडल करावा. कोणत्या राजकीय पक्षाच्या आयटी टीमला द्यायची काय गरज आहे', असा टोलाही राऊत यांनी लगावला होता.