धक्कादायक! चिमुकल्यानं चावलं सापाला, खेळता-खेळता घेतला पंगा

धक्कादायक! चिमुकल्यानं चावलं सापाला, खेळता-खेळता घेतला पंगा

चिमुकल्यानं सापाचं पिल्लू खेळता खेळता चावलं आणि घात झाला.

  • Share this:

बरेली, 06 सप्टेंबर : अनेकदा लहान मुलांकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तरीही ते खूप घातक ठरू शकतं. लहान मुलांना मिळेल ती वस्तू तोंडात घालून चावायची सवय असते. खेळणी असो किंवा जमिनीवर असलेली एखादी गोष्ट. एका चिमुकल्यानं तर थेट जमिनीवरच्या सापाच्या पिल्लाला उचलून खेळण्याच्या नादात तोंडात घातल्याचा प्रकार समोर आहे.

सापानं माणसाला चावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत पण इथे तर खेळण्याच्या नादात चिमुकल्यानं सापाशी पंगा घेतला आहे. खेळता खेळता त्यानं सापालाच चावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेत सध्या चिमुकल्याची प्रकृती नाजूक असून त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकरण समोर आला. चिमुकल्यानं खेळता खेळता तोंडात साप पकडला आणि चावायला लागला. यामध्ये सापाचा मृत्यू झाला आणि चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचा-MP: रेल्वे स्थानकाजवळ मोठा स्फोट; 30 ते 35 फूट उंच उडाले दगड, पाहा LIVE VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार फतेहगंजच्या दक्षिण क्षेत्रातील भोलापूर इथला आहे. चिमुकल्यानं सापाचं पिल्लू खेळता खेळता चावलं आणि घात झाला. जेव्हा नातेवाईकांना हा चिमुकला तोंडात चावत असल्याचं दिसलं त्यावेळी त्यांनी तोंडू उघडून पाहिल्यावर धक्काच बसला.

चिमुकल्याच्या तोंडात सापाची शेवटी होती. 6 इंचाच्या सापाचं पिल्लू या चिमुकल्यानं चावून खाल्लं होतं. या चिमुकल्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. या मुलाची प्रकृती सध्या ठिक असून दोन तासांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 6, 2020, 11:01 AM IST

ताज्या बातम्या