देवेंद्र फडणवीस आणि आपण पुन्हा एकत्र का आलो? अजित पवारांनी दिलं उत्तर

देवेंद्र फडणवीस आणि आपण पुन्हा एकत्र का आलो? अजित पवारांनी दिलं उत्तर

संकटाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तर त्यात गैर काय?

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 28 ऑगस्ट: विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठीवर आल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, संकटाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तर त्यात गैर काय, असं मिश्किल भाष्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनाला अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र का आले, यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा..सुशांतसिंह प्रकरणात आदित्य यांचं नाव घेतलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आमच्या एकत्रित येण्याची ब्रेकिंग न्यूज होते. पण संकट काळात राज्यातील सत्ताधारी विरोधक मिळूनच सामना करतात, ही महाराष्ट्राची परंपरा असल्याची अजित पवार यांनी यावेळी सगळ्यांना आठवण करून दिली.

दरम्यान, खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांची लूट थांबावी, यासाठी या पुढे एखाद्या रुग्णाकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त बिल आकारलं गेलं तर त्याचं लेखा परीक्षण केलं जाणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकार युद्ध पातळीवर सुविधा उपलब्ध करून देत आहे. मात्र, काही नागरिक नियम पाळत नाहीत. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना या पुढे एक हजार रुपये दंड आकारला जाईल, त्यासाठीचा निर्णय घेणार असल्याचही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही...

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही आहे, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, गेली 40 दिवस जे खुलासे झाले नाहीत ते सीबीयच्या तपासात समोर येत आहेत. मग सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता? याचा तपास व्हायला हवा. हार्ड डिस्क नष्ट कुणी केल्या हे देखील समोर यायला हवं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याची विशेषत: मुंबईची कोरोनाबाबत स्थिती समाधानकारक नाही. मात्र, पुणे जिल्ह्यात चाचण्या संख्या जास्त आहेत. मुंबईत चाचण्या वाढल्या पाहिजेत. देशातील 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोनाबाधित आणि मृत्यूचा असे दोन्ही दर कमी व्हायला पाहिजेत.

हेही वाचा...पुण्यात भाजप सरपंचाने केला भयंकर घोटाळा, संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत...

अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द न करता त्या घ्याव्याच लागतील. मात्र त्यासंदर्भात तारखा ठरवण्याचे निर्देश प्रत्येक राज्यांना असतील. UGC ने दिलेल्या तारखांना परीक्षा घेता येणार नसतील तर नवीन तारखा UGC सोबत चर्चा करून ठरवण्यात याव्या आणि जाहीर कराव्यात, असा निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं दिला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान टळणार आहे. 'आवाज' म्हटल्यावर 'माझा आवाज कुणी दाबू शकत नाही', असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी गंमतीत लगावला.

Published by: Sandip Parolekar
First published: August 28, 2020, 3:16 PM IST

ताज्या बातम्या