नियम शिथिल होताच पुण्यातल्या 'या' भागात मोठा फटका, 12 रुग्णांवरून आकडा थेट 372 वर

नियम शिथिल होताच पुण्यातल्या 'या' भागात मोठा फटका, 12 रुग्णांवरून आकडा थेट 372 वर

पाचव्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आणि हळूहळू राज्य अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. पण अशात नियम शिथिल होताच पुण्यातील एका भागात रुग्ण झपाट्याने वाढल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

पुणे, 08 जून : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पाचवा टप्पा अवलंबण्यात आला आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आणि हळूहळू राज्य अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. पण अशात नियम शिथिल होताच पुण्यातील एका भागात रुग्ण झपाट्याने वाढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने पोलिसांनी आज या भागातून रूटमार्च काढला आणि लोकांना शक्यतो घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये या भागात अवघे 12 रुग्ण होते. पण लॉकडाऊन 4 दरम्यान नियम शिथिल होताच इकडे रूग्ण संख्या थेट 372 वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

विशेषत: जनता वसाहत आणि पानमळा या स्लम एरियात कोरोनाची साथ वेगाने पसरू लागली आहे. त्यामुळे नियम जरी शिथिल झाले असले तरी अत्यावश्यक काम वगळता बाहेर न जाण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शक्य तितकं घरात आणि सुरक्षित राहणं गरजेचं आहे.

पिंपरीत तुफान राडा, दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

पिंपरीत तुफान राडा, दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आनंद नगर झोपडपट्टीतील शेकडो नागरिक आज रस्त्यावर उरतल्यानं मोठा तणाव निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. जमलेल्या नागरिकांना घरात परतवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार आणि बळाचा वापर करावा लागला. ज्यामध्ये एक नागरिक किरकोळ जखमी झाला. त्यामुळे नागरिकांचा रागअनावर झाला आणि त्यांनी पोलिसांवर तुफान दगड फेक करत त्यांच्या वाहनांची नासधूस केली आहे.

मुंबईत धक्कादायक प्रकार, डॉक्टर फिरकले नाहीत म्हणून 16 तास मृतदेह घरात पडून

सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांची वस्ती असलेल्या आनंद नगर झोपडपट्टीमध्ये आतापर्यंत दिडशे पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्यानं हा परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करून प्रतिबंधित करण्यात आला होता. सुरवातीच्या काळात या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं. मात्र, मगापालिका प्रशासन केवळ आपल्याला डांबून ठेवत असून कोणत्याही सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करत या आधीही हे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते.

गर्लफ्रेंडसोबत घेतला PORN रिव्हेंज, चक्क Paytm वरून विकले अश्लील व्हिडिओ

संपादन - रेणुका धायबर

First published: June 8, 2020, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading