जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणे हादरलं: मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग; कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग

पुणे हादरलं: मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग; कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग

Crime in Pune: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील एका कुटुंबाने विवाहितेला मूल होत नसल्याने तिला नरक यातना दिल्या आहेत. भोंदूबाबाच्या सांगण्यावरून आरोपींनी पीडितेला कोंबडीचं रक्त पाजलं (Forced to drink blood of hen) आहे. तर सासऱ्याने तिचा विनयभंग (Sexual Molestation) केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 21 सप्टेंबर: वंशाला दिवा मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कुटुंबाने भोंदूबाबाच्या सांगण्यावरून एका विवाहितेला नग्न करून तिच्या अंगाला अंगारा फासला होता. ही घटना ताजी असताना अघोरीपणाच्या परिसीमा गाठणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील एका कुटुंबाने विवाहितेला मूल होत नसल्याने तिला नरक यातना दिल्या आहेत. तसेच तिला माहेराहून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण करत छळलं आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? फिर्यादी महिलेचं तीन वर्षांपूर्वी आरोपी पती अमित वाघुले (वय-33) याच्याशी लग्न झालं होतं. आरोपी अमितने इंजिनिअर असल्याची खोटी माहिती देऊन पीडितेशी लग्न केलं होतं. मूल जन्माला घालण्यासाठी नवरा लैंगिकदृष्ट्या सक्षम नव्हता, त्यामुळे पीडितेला मागील तीन वर्षात मूलबाळ झालं नाही. ही बाब पीडितेनं आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर सासरच्यांनी पीडितेचा छळ करायला सुरुवात केली होती. तसेच मूल होण्यासाठी एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून पीडितेला कोंबडीचं रक्त पाजून अघोरी प्रकार देखील केला आहे. हेही वाचा- डोंगरावर फिरायला गेलेल्या दीराने केली भलतीच मागणी; नकार देताच वहिनीचा भयंकर शेवट तसेच मूल जन्माला घालण्यासाठी नवरा लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्याच्यावर विविध औषधोपचार केला जात होता. दरम्यान नवऱ्याच्या औषधोपचारावर पैसे खर्च करण्यापेक्षा मी तुला मूल देतो, असं म्हणत सासऱ्याने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. आरोपींकडून होणारा त्रास पीडितेनं निमूटपणे सहन केला. पण आरोपींकडून त्रास वाढतच जात होता. रत्नागिरीत घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आण, असा तगादा सासरच्या मंडळींकडून लावण्यात येत होता. हेही वाचा- पप्पा, मला टॉर्चर करणं बंद करा! प्रेमाला विरोध करणाऱ्या वडिलांना लेकीचा संदेश शेवटी सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं 19 सप्टेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचा पती अमित वाघूले, सासरा सुदाम वाघूले (वय 63), सासू संध्या वाघूल (वय 53) यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात