पिंपरी, 20 सप्टेंबर: पिंपरी जवळील देहूरोड येथील घोराडेश्वर डोंगरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका तरुणाने पहाटे डोंगरावर आपल्या वहिनीसोबत फिरायला गेल्यानंतर, तिची निर्घृण हत्या (Sister in law brutal murder) केली आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेचा गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचं डोकं दगडानं ठेचलं आहे. काही स्थानिक नागरिकांना डोंगरावरील एका झुडुपात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून संशयित आरोपी चुलत दीरास पोलिसांनी ताब्यात घेतलं (Accused arrest) आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहे. हत्या झालेल्या 25 वर्षीय महिला देहूरोड येथील थॉमस कॉलनीत वास्तव्याला होत्या. तर तुकाराम कोंडीबा धडस असं अटक केलेल्या 24 वर्षीय आरोपी चुलत दीराचं नाव आहे.
हेही वाचा-नाशिक: महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्रांताधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ
नेमकं प्रकरण काय आहे?
मृत महिला रविवारी पहाटे आपल्या चुलत दीरासोबत घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेल्या होत्या. दरम्यान नराधम चुलत दीराने मृत महिलेकडे शरीरसुखाची (Demand sexual relation) मागणी केली. पण पीडित महिलेनं शारीरिक संबंधासाठी नकार दिला. वहिनीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपी चुलत दीराने पीडितेची थेट गळा आवळून हत्या केली आहे.
हेही वाचा-फ्रेंड रिक्वेस्ट न स्विकारल्याने बड्या नेत्याकडून कार्यकर्त्याच्या पत्नीला मेसेज
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेची ओळख पटू नये, म्हणून तिचं दगडाने डोकं ठेचलं आहे. यानंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह एका झुडुपात टाकून घटनास्थळावरून पळ काढला आहे. सोमवारी सकाळी काही स्थानिक नागरिकांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मृत महिलेची ओळख पटवून पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी दीराला गजाआड केलं आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Pimpari