मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे हादरलं! पती रुग्णालयात असल्याचं कळताच साधला डाव; विवाहितेला गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार

पुणे हादरलं! पती रुग्णालयात असल्याचं कळताच साधला डाव; विवाहितेला गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Gang Rape in Pune: पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षीय विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

भोर, 08 नोव्हेंबर: पुणे (Pune) जिल्ह्याच्या भोर (Bhor) तालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षीय विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार (Married woman gang rape) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असल्याचं समजल्यानंतर आरोपींनी डाव साधला आहे. एकट्या महिलेला गुरांच्या गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार (gang rape in cowshed) केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

अनिल वाडकर, महेश सोनवणे आणि हनुमान कापरे असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं असून सर्व आरोपी भांबवडे येथील रहिवासी आहेत. पीडितेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. यावेळी पीडित महिलेचा पती शिरवळ येथील एका रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान, फिर्यादी महिला शेतात जात असताना, आरोपींनी तिला अडवलं आणि तुझ्या पतीने मोबाइल चार्जर आणि पॅंट देण्यास सांगितलं असल्याची बतावणी केली. यावेळी संबंधित वस्तू मी स्वत: घेऊन रुग्णालयात जाईल, असं पीडितेनं आरोपींना सांगितलं. यामुळे संतापलेल्या आरोपींनी पीडितेला धमकी देत निघून गेले.

हेही वाचा-पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्..; डजनभर नराधमांनी तोडले लचके, नग्नावस्थेतच फेकलं

पण सायंकाळी सहा वाजता घरी जाण्यापूर्वी गुरांना चारा टाकण्यासाठी पीडित महिला गोठ्यात गेली. यावेळी अनिल वाडकर आणि महेश सोनवणे दोघांनी गोठ्यात शिरून जबरदस्ती करत फिर्यादीवर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं स्वत: राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा- पुणे: क्रिकेटच्या चेंडूवरून पेटला वाद; आरोपींनी मुलीला घराबाहेर काढत केलं विकृत कृत्य

परस्परविरोधी तक्रारी दाखल...

विवाहित पीडितेनं शनिवारी सामूहिक बलात्काराची फिर्याद दिल्यानंतर, आरोपींच्या पत्नीने पीडितेच्या नवऱ्याविरोधात बलात्काराची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी महिलेचा पती सुनील धर्माजी कापरे यांना ताब्यात घेतलं आहे. आरोपीने ऑक्टोबर 2020 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत भांबवडे आणि कापूरहोळ येथील लॉजमध्ये नेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Gang Rape, Pune