• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्...; डजनभर नराधमांनी तोडले लचके, नग्नावस्थेतच रस्त्याच्याकडेला फेकलं

पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्...; डजनभर नराधमांनी तोडले लचके, नग्नावस्थेतच रस्त्याच्याकडेला फेकलं

Gang rape in Railway station: रेल्वे स्थानकावर पाणी घेण्यासाठी उतरलेल्या तरुणीवर तब्बल डजनभर नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  पाटणा, 07 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलीला रात्रभर डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार (Minor girl raped in kalyan railway station) केला होता. आरोपीनं पीडित मुलीच्या मित्राला हातोड्याचा धाक दाखवून पळवून लावलं होतं. त्यानंतर पीडित मुलीला एका पडक्या घरात नेत तिच्यावर अत्याचाराचा कळस गाठला होता. ही घटना ताजी असताना, बिहारची (Bihar) राजधानी पाटणा (Patana) याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पाटणा रेल्वेस्थानकावरील एका तरुणीवर तब्बल डजनभर नराधमांनी सामूहिक अत्याचार (woman gang raped in patana railway station) केला आहे. आरोपींनी बलात्कार केल्यानंतर, बेशुद्धावस्थेतील पीडित तरुणीला नग्नावस्थेत रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला आहे. दुसऱ्या दिवशी काही स्थानिक नागरिकांनी पीडित मुलगी बेशुद्धा अवस्थेत आढळल्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शुद्धीवर आलेल्या तरुणीनं तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-अल्पवयीन मुलीला भररस्त्यात केलं KISS; कोर्टानं तरुणाला घडवली आयुष्यभराची अद्दल नेमकं काय घडलं? पीडित मुलगी मूळची ओडिशा येथील रहिवासी असून ती रेल्वेनं कानपूरला चालली होती. दरम्यान बिहारची राजधानी पाटणा जंक्शनवर पाणी घेण्यासाठी पीडित तरुणी रेल्वेतून खाली उतरली. पण पाणी भरून रेल्वेकडे येईपर्यंत तिची गाडी सुटली. त्यामुळे ती पाटणा रेल्वे स्थानकावरील एका बाकड्यावर बसली. पीडित तरुणीला बाकड्यावर एकटं बसलेलं पाहून एक आरोपी तिच्याजवळ आला आणि काही मदत हवी आहे का? अशी विचारणा केली. यावेळी पीडितेनं आपली ट्रेन चुकल्याचं आरोपीला सांगितलं. हेही वाचा-मुंबई: रात्रपाळीस गेलेला नवरा घरी परतला अन् भयावह अवस्थेत दिसली नवविवाहित पत्नी त्यावर आपण तुला पुढील ट्रेनमध्ये बसवून देतो, असं आरोपीनं तिला सांगितलं. काही वेळ गप्पा मारल्यानंतर आरोपीनं पीडितेला शीतपेय प्यायला दिलं. हे शीतपेय प्यायल्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाली, त्यानंतर थेट रुग्णालयातच तिल शुद्धीवर आली आहे. यानंतर पीडित तरुणीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात लपून बसलेल्या एका नराधम आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: