Home /News /pune /

पुणे: क्रिकेटच्या चेंडूवरून पेटला वाद; आरोपींनी मुलीला घराबाहेर काढत केलं विकृत कृत्य

पुणे: क्रिकेटच्या चेंडूवरून पेटला वाद; आरोपींनी मुलीला घराबाहेर काढत केलं विकृत कृत्य

क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून (dispute over cricket ball) चार जणांनी मायलेकीला मारहाण करत त्यांच्यासोबत गैरवर्तन (Complainant and her daughter beaten and abused) केलं आहे.

    पिंपरी, 08 नोव्हेंबर: पुण्याजवळील पिंपरी (Pimpri) येथे काही जणांनी एका मुलीला घराबाहेर काढून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून (dispute over cricket ball) चार जणांनी मायलेकीला मारहाण करत त्यांच्यासोबत गैरवर्तन (Complainant and her daughter beaten and abused) केलं आहे. संबंधित घटना मावळ तालुक्यातील इंदोरी गावच्या हद्दीत 1 नोव्हेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनंतर, तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नंदकुमार कुसळ, मंदा कुसळ, स्वाती कुसळ आणि कोमल कुसळ असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं असून संबंधित सर्वजण मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदकुमार कुसळ यांची मुलं अन्य काही मुलांसोबत घराच्या परिसरात क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळत असताना, फिर्यादी महिलेला बॉल लागला. त्यामुळे फिर्यादी महिलेनं लागलेला बॉल आपल्या ताब्यात घेतला. हेही वाचा-पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्..; डजनभर नराधमांनी तोडले लचके, नग्नावस्थेतच फेकलं यामुळे संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसत तिच्या मुलीला घराबाहेर काढून मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित मुलीला शिवीगाळ करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलं आहे. आरोपी नंदकुमार याने पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादी महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे. हेही वाचा-लपायला गेली अन् आयुष्यभरासाठी झाली नजरेआड; लिफ्टमधून पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत पीडित महिलेच्या तक्रारीवरून, तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी चार आरोपींविरोधात विनयभंग, मारहाण आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pimpari

    पुढील बातम्या