जुन्नर, 13 एप्रिल: तलवारीनं केक कापून व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी वकील पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खारघर येथून वाहनाने हिवरे बुद्रुकला आलेल्या मुलाला क्वारंटाईन करण्याऐवजी त्याचा वाढदिवस साजरा केला. तलवारीनं केक कापला. आता हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलं आहे. ओतूर पोलिसांनी स्वप्नील गाडेकर व वकील अरुण गाडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा..चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला जाळलं, पेटत्या पत्नीनेच पतीला मारली मिठी
घरातील तलवार बाहेर काढून कर्मेश गाडेकर याचा वाढदिवसाचा केक कापण्याच्या अगोदर तलवार हातात देऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टिक टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
काय आहे प्रकरण?
ॲडव्होकेट अरुण गाडेकर यांचा मुलगा कर्मेश हा नुकताच नवी मुंबईतील खारघर येथून एका वाहनाने जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथील सहकारनगर येथे आला होता. कर्मेश ज्या विभागातून आला आहे तो विभाग कॉन्टेलमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. काल, 11 एप्रिलला कर्मेशचा वाढदिवस होता. अरुण गाडेकर यांनी मुलाचा वाढदिवस जल्लोषात वाढदिवस साजरा केला. याशिवाय या मुलाचा केक कापताना तलवार वापरली. एका कर्तव्यदक्ष सामाजिक भान असणाऱ्या वकिलाच्या मुलाने असे वागणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा..नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मामासह दोन आयटी इंजिनीअर भाच्यांचा बुडून मृत्यू
तसेच मुंबई, नवी मुंबई परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना या दूषित वातावरणात वकिलाच्या मुलाने अशा पद्धतीने वागणे योग्य आहे का, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर रविवारी ओतूर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिस कॉन्टेबल मगन धोंडू भुसावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्वप्नील गाडेकर व अरुण गाडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ओतूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली आहे.
संपादन-संदीप पारोळेकर