नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मामासह दोन आयटी इंजिनीअर भाच्यांचा बुडून मृत्यू

नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मामासह दोन आयटी इंजिनीअर भाच्यांचा बुडून मृत्यू

तिघे मामा-भाचे रविवारी चास शिवारातील मोडवहळ परिसरातील मुळा नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते.

  • Share this:

शिर्डी, 12 एप्रिल: नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मामासह दोन आयटी इंजिनीअर भाच्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील चास शिवारातील मोडवहळ परिसरातील मुळा नदीपत्रात रविवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास ही घटना घडली.

शिक्षक मामा शिक्षक सुनील तुकाराम वाडेकर (वय- 48), भाचा प्रवीण दत्तात्रय फाफाळे (वय 32) व भाचा सचिन दत्तात्रय फाफाळे (वय-36) अशी मृतांची नावं आहेत. प्रवीण आणि सचिन दोन्ही भाऊ असून आयटी इंजिनीअर होते.

हेही वाचा..मालेगाव बनला कोरोनाचा 'हॉटस्पॉट', मात्र कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही!

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तिघे मामा-भाचे रविवारी चास शिवारातील मोडवहळ परिसरातील मुळा नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. प्रवीण व सचिन या दोघांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. क्षणाचा विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मामा सुनील वाडेकर यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या दुदैवी घटनेमुळे चास आणि पिंपळदरी गावांवर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत शिक्षक सुनील वाडेकर आदर्श पुरस्कार मिळालेले शिक्षक होते.

हेही वाचा...अवघ्या 4 दिवसांत 80 जिल्ह्यांत पोहोचला कोरोना, अर्ध्या भारतात फैलाव

दरम्यान, राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे. नागरिकांनी घरातच थांबावे. घराबाहेर पडू नये असं सरकार आवाहन करत आहे. मात्र, काही लोक गांभार्याने घेताना दिसत नाही आहेत. तिन्ही मामा-भाचे घरातच थांबले असते तर त्याच्यावर मृत्यू ओढावला नसता, अशी चर्चा सुरु आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 12, 2020, 10:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading