चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला जिवंत जाळलं, पेटत्या पत्नीनेच पतीला मारली मिठी

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला जिवंत जाळलं, पेटत्या पत्नीनेच पतीला मारली मिठी

म्हणतात की संशयाचा भूत डोक्यात शिरलं की ते काही केल्या लवकर निघत नाही.

  • Share this:

मनमाड, 12 एप्रिल: म्हणतात की संशयाचा भूत डोक्यात शिरलं की ते काही केल्या लवकर निघत नाही. संशयामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर अनेकांचा बळी देखील गेला आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या साळसाने येथे घडली आहे.

चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीच्या अंगावर इंधन टाकून तिला जिवंत जाळले. मात्र, पेटलेल्या पत्नीने पतीला मिठी मारली. पत्नीचा जागेवरच तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही 99 टक्के भाजले होते.

हेही वाचा.. नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मामासह दोन आयटी इंजिनीअर भाच्यांचा बुडून मृत्यू

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मनीषा वाघ आणि कैलास वाघ असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. चांदवडपासून जवळ असलेल्या सलसाने येथे राहत होते. मनीषा आणि कैलासच्या लग्नाला अवघे 10 महिने झाले होते. कैलास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रविवारी दुपारी दोघांच कडाक्याचं भांडण झालं. भांडण विकोपाला जाऊन कैलासने पत्नीच्या अंगावर इंधन टाकून तिला जिवंत जाळलं. पेट घेतलेल्या मनीषा देखील पतीला मिठी मारली. या घटनेत पत्नीचा जागीच तर 99 टक्के भाजलेल्या पतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र ज्याने पत्नीचा निर्घृणपणे खून केला त्याचा ही मृत्यू झाला असल्याने अटक करणार कोणाला असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

हेही वाचा...हल्लेखोरांनी कापला पोलिसाचा हात, डॉक्टरांनी साडेसात तास शस्त्रक्रिया करून जोडला

कैलास कायम पत्नी मनीषाच्या चारित्र्याचा संशय घेत होता. तिला नेहमी मारहाण करत होता. मात्र, रविवारी तर त्याने टोकाचं पाऊल उचलून पत्नीली जिवंत जाळलं. मात्र पेटत्या पत्नीने त्याला कडकडून मिठी मारली आणि त्यात कैलासही 99 टक्के भाजला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. डोक्यात संशयाचा भूत गेलं आणि त्यानं 10 महिन्यातच एका जोडप्याचा बळी घेतल्याचे पोलिसांनी सांगितलं.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 12, 2020, 11:15 PM IST

ताज्या बातम्या