Home /News /national /

महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी बातमी, कोरोनाची नवी आकडेवारी समोर

महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी बातमी, कोरोनाची नवी आकडेवारी समोर

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डरसुद्धा होण्याची भीती असते. ज्यामुळे इस्किमिक किंवा हेमरेजिक (रक्तस्राव) स्ट्रोक देखील होतो. या विषाणूंमुळे मेंदू आणि मेनिन्जेसमध्ये थेट संसर्ग होऊ शकतो. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणालीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदू आणि नसा खराब होऊ शकतात.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डरसुद्धा होण्याची भीती असते. ज्यामुळे इस्किमिक किंवा हेमरेजिक (रक्तस्राव) स्ट्रोक देखील होतो. या विषाणूंमुळे मेंदू आणि मेनिन्जेसमध्ये थेट संसर्ग होऊ शकतो. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणालीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदू आणि नसा खराब होऊ शकतात.

सध्या देशातील सात राज्यात दहा हजाराहून अधिक नवी प्रकरण पुढे आलेले आहेत.

नवी दिल्ली, 12 जून : कोरोना व्हायरसची लागण होण्याचा दर देशातील बर्‍याच राज्यांत वेगाने वाढत आहे. पण महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशात अतिवेगवान वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास असे दिसून आले आहे की, गेल्या दहा दिवसांत या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत  जेथे 15 दिवसांपूर्वी दररोज सुमारे एक हजार प्रकरणे नोंदवली गेली. आता मात्र  दररोज सरासरी 1300 प्रकरणे नोंदवली जात आहेत. गुरुवारी तर हा आकडा 1500 च्या पुढे गेला आहे.  तामिळनाडूमध्ये जेथे 700 ते 800 प्रकरणे पुढे येत होती, आता मात्र दररोज 1300 हून अधिक  नवीन प्रकरणे पुढे येत आहे  आणि गुरुवारी तर 1927 प्रकरणे नोंदविली गेली. हरियाणामध्ये हाच दर  तिप्पट झाला आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये दुप्पट झाल्याचे  दिसून आले आहे. हेही वाचा-पावसाळ्यात कोरोनाचा धोका आणखी वाढणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं सध्या देशातील सात राज्यात दहा हजाराहून अधिक नवी प्रकरण पुढे आलेले आहेत. यासह, देशातील सर्वाधिक संक्रमित राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश  पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. हरियाणामध्ये अवघ्या चार दिवसांत 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हरियाणामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 7 जूनपर्यंत कोरोनामधून राज्यात केवळ 24 जणांचा मृत्यू झाला होता पण 11  जून रोजी हा आकडा 52 झाला. उत्तर प्रदेशामध्ये  दोन दिवसांत विक्रमी मृत्यूची नोंद झाली आहे.  उत्तर प्रदेशामध्ये 31  मेपर्यंत 201 लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु, गुरुवारपर्यंत 321  लोकांचा मृत्यू झाला होता. हेही वाचा-रक्ताच्या नात्याचा घोटला गळा, वयस्कर आईवर मुलानेच केला बलात्कार गेल्या दोन दिवसांत तेथे विक्रमी मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाने  गेल्या 31  मे पर्यंत 416 जणांचा बळी घेतला. परंतु, गुरुवारी ही संख्या 984 च्या वर पोहचली. देशातील महाराष्ट्रासह या सात राज्यात जर कोरोना विषाणूचा प्रसार रोखता आला नाही तर परिस्थिती अजून भयंकर होण्याची शक्यता आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या