मोठी बातमी! राज्यात 1 लाख कोरोनाबाधित, 3500 हून जास्त दगावले तरी उघडल्या शाळा

मोठी बातमी! राज्यात 1 लाख कोरोनाबाधित, 3500 हून जास्त दगावले तरी उघडल्या शाळा

देशात गेल्या 24 तासांत 10956 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 जून: देशात लॉकडाऊनचे (Lockdown)नियम शिथिल केल्यानंतर कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्यानं वाढला आहे. देशात गेल्या 24 तासांत 10956 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे नियम कठोर करण्याची तयारी सुरू झाली आहे.

हेही वाचा..Unlock 1 नंतर कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी, 24 तासांत 10,956 नवे रुग्ण

महाराष्ट्र (Maharashtra) सरकार देखील लॉकडाऊनबाबत विचाराधीन आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. राज्यात जळपास एक लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3500 हून जास्त रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. तरी देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी शाळा उघडण्यात आल्या आहेत.

तीन महिन्यापासून बंद होत्या शाळा..

देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद आहेत. 16 मार्चपासून बंद करण्यात आलेल्या शाळा (School)आता पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. दरम्यान, अद्याप शाळेत विद्यार्थी येत नाही आहेत. प्रशासकीय कामांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत येत आहेत. यामुळे कोरोन व्हायरस आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात...

'टाइम्सनाऊ'च्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील शाळा उघडण्यात आल्या आहेत. शिक्षकांना आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस काम करण्यात प्रशासनानं आदेश दिले आहेत. शिक्षकांना सॅनिटायजर आणि मास्क बाळगण्यास सांगण्यात आलं आहे. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असतानाही शिक्षकांना शाळेत हजेरी लावावी लागत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

हेही वाचा.. 12 वर्षांखालच्या मुलांना Corona लस घेतल्याशिवाय शाळा नको यासाठी कोर्टात याचिका

महाराष्ट्रात काही भागात एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई यूनिव्हर्सिटीने 19 जूनपर्यंत सुट्टी वाढवली आहे. याबाबत सर्कुलर जारी करण्यात आलं आहे.

First published: June 12, 2020, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading