बुलढाणा, 03 सप्टेंबर: धावत्या रिक्षात अचानक साप (Snake found in running rickshaw) निघाल्यानं रिक्षाचा मोठा अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या भयानक घटनेत एका मजूराचा दुर्दैवी मृत्यू (1 Worker died in accident) झाला आहे. तर रिक्षा उलटल्यानं चालकासह रिक्षातील अन्य मजूर देखील गंभीर जखमी (4 injured) झाले आहेत. संबंधित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास बुलडाणा- देऊळघाट मार्गावर घडली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? देऊळघाट येथील काही मजूर बुलडाणा शहरातील एका बांधकामावर कामासाठी गेले होते. बांधकामाच्या ठिकाणी दिवसभर काबाड कष्ट करून संबंधित मजूर सायंकाळी रिक्षानं आपल्या घरी परतत होते. दरम्यान एकेठिकाणी रिक्षा आदळली असता. संबंधित मजूराच्या पिशवीतून एक भला मोठा साप बाहेर आला. धावत्या रिक्षात सापाला पाहून रिक्षात एकच गोंधळ निर्माण झाला. हेही वाचा- बेपत्ता असणाऱ्या दीर-भावजयीचा हृदयद्रावक शेवट; धक्कादायक घटनेनं यवतमाळ हादरलं यामुळे चालकाचंही रिक्षावरील नियंत्रण हटलं आणि रिक्षा उलटून मोठा अपघात झाला. या अपघातात दिवसभर काबाडकष्ट करून घरी परतणाऱ्या एका 54 वर्षीय मजूराचा दुर्दैवी अंत झाला आहे. प्रल्हाद रामजी हिवाळे असं अपघातात मृत पावलेल्या मजूराचं नावं असून ते देऊळघाट येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर हिवाळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हेही वाचा- आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं;थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास सुपडा कौतिकराव हिवाळे, गणेश शिवलाल बिबे, मनोज सुखदेव जाधव आणि रिक्षाचालक रशिद मिर्झा अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. या अपघातानंतर संबंधित जखमींना आसपासच्या लोकांनी तातडीनं नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. संबंधित सर्वांवर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेत एका बांधकाम मजूराचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.