चहावाल्या पुणेकराची कमाल; जानेवारीत सिक्युरिटी गार्ड, लॉकडाऊनमध्ये झाला व्यावसायिक

चहावाल्या पुणेकराची कमाल; जानेवारीत सिक्युरिटी गार्ड, लॉकडाऊनमध्ये झाला व्यावसायिक

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, मात्र या तरुणाने त्या संधीचं सोनं केलं

  • Share this:

पुणे, 9 जानेवारी : महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातील एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड रेवन शिंदे (Revan Shinde) याची डिसेंबरमध्ये नोकरी सुटली. दुसऱ्या नोकरीच्या शोधात प्रयत्न केला, मात्र दुर्देवाने त्याच्या हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केला. कोरोनाच्या काळात सर्वांनाच नोकरीशिवाय जीवन जगणं अवघड झालं होतं. शेवटी रेवन याला एक इनोव्हेटीव आयडिला सापडली आणि त्याने आलेल्या या संकटाचं रुपांतर संधीत केलं, आज रेवन एक व्यावसायिक आहे. आणि महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमावतो.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात राहणारा रेवन एका कंपनीत सिक्युरिटा गार्डचं काम करीत होता. नोकरी गेल्यानंतर त्याच्या हातात काहीच नव्हते. मात्र नुसतं बसून राहणं त्याला पसंत नव्हतं. त्याने फॅफे18 नावाने एक फूड आऊटलेट सुरू केलं. (A young man from Pune started a business in Lockdown and now earns thousands of rupees) या फूट आऊटलेटमध्ये तो चहा विकतो. दिवसाला साधारण 600 ते 700 कप चहा विकला जातो. आपल्या टीमसोबक रेवन महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमावतो. तो कॉर्पोरेट ऑफिस आणि इंडस्ट्रियल वर्कर्संना चहा विकतो.

हे ही वाचा-हेच बाकी होतं! लस घेतल्याच्या 3 आठवड्यांनंतर नर्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

रेवनने सांगितलं की, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जेव्हा पुन्हा कार्यालयं खुली झाली तेव्हा लोकांना चहा मिळत नव्हता. कारण अनेक फूट स्टॉल्स आणि छोटी छोटी दुकानं यादरम्यान बंद झाली. मात्र रेवनने नव्याने सुरू केलेल्या या फूट आऊटलेटला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यादरम्यान रेवनने मोफत चहा आणि कॉफीची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. आता तर दररोज रेवन 600 ते 700 कप चहाची विक्री करतो.

Published by: Meenal Gangurde
First published: January 9, 2021, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading