
फाइजरची कोरोना लस घेतल्याच्या तीन आठवड्यांनंतर ब्रिटेनच्या एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. फायजर कंपनीने दावा केला आहे की, त्यांची लस कोरोनापासून बचाव करण्यासाठी 95 टक्के सुरक्षित आहे. मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लसीकरण केल्यानंतर इम्युनिटी तयार होण्यासाठी वेळ लागतो. आणि या कारणास्तव लोकांना लसीकरण केल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायला हवे.

ब्रिटेनमधील वेल्स येथे राहणाऱ्या नर्सने सांगितलं की, ती फायजरच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत होती, तेव्हा तिच्यात कोरोनाची लक्षणं दिसून लागली. बीबीसीसोबत बोलताना तिने सांगितलं की, लसीकरण केल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला धक्काच बसला. यापूर्वी अमेरिकेतील सैन डियागोमध्ये राहणारी नर्स मॅथ्यू डब्ल्यू फायजरची लस लावल्याच्या 6 दिवसांनंतर कोरोना पॉझिटिव्ह आली होती.

ब्रिटेनच्या नर्सने सांगितलं की, लस लावल्यानंतर शांत वाटलं होतं आणि मी सुरक्षित असल्याचं समाधान झालं. मात्र ही सुरक्षेची भावना खोटी निघाली. नर्सने असाही दावा केली की, तिला सांगण्यात आलं होतं की, लस लावल्याच्या 10 दिवसांनंतर तिला कोरोनापासून सुरक्षा मिळेल.

नर्सने सांगितलं की, लसीकरण केल्याच्या तीन आठवड्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आणि तिचा पती, मुलगा दोघेही पॉझिटिव्ह निघाले. रिपोर्टनुसार कोरोनाची लस लोकांना गंभीर आजाराची लागण होण्यापासून वाचवते. या कारणामुळे जर लोकांना लस लावल्यानंतरही कोरोनाची लागण होत असेल तर हे गंभीर आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार ब्रिटेनचे प्रोफेसर टिम स्पेक्टरने सांगितलं की, फायजरची लस लावल्यानंतर ब्रिटेनच्या नॅशनल हेल्थ सर्विसचे अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

फायजर कंपनीने सांगितलं की, त्यांना लशीपासून सुरक्षा मिळण्याची स्थिती त्यांनी 21 दिवसांनंतर दुसऱ्या टप्प्यातील लस घेतल्यानंतर होईल. ब्रिटेनने दुसऱ्या टप्प्यातील लस देण्याच्या वेळेत वाढ केली आहे. हा वेळ तीन आठवड्यांनी वाढून 12 आठवड्यांपर्यंत करण्यात आला आहे.




