नवी दिल्ली, 21 मे : कोरोना संक्रमणाच्या (Coronavirus) सुरुवातीच्या टप्प्यात देशभरात जीवरक्षक किट आणि सॅनिटायझरची मागणी वाढली आणि तुटवडा निर्माण झाला. उत्तर प्रदेशातही(Uttar pradesh)मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची आवश्यकता भासली गेली होती, पण आता याच राज्यात मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरचं उत्पादन करण्यात येत आहे. आता परिस्थिती अशी आहे की सॅनिटायझर उत्तर प्रदेशातून इतर राज्यात पाठविण्यात येत आहे आणि त्यात महाराष्ट्रसुद्धा आहे. गेल्या २५ मार्च रोजी टाळेबंदी सुरू होताच उत्तर प्रदेश राज्य सरकारने सर्व साखर कारखान्यांना सॅनिटायझर्स बनविण्याचे निर्देश दिले होते. सरकारच्या आदेशानंतर साखर कारखान्याने ते तयार करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचं उत्पादन वाढलं आणि साखर कारखान्यांव्यतिरिक्त आता इतर युनिटमध्येही हँड सॅनिटायझर्स बनवले जात आहेत. राज्यात आता हँड सॅनिटायझर्स मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. सॅनिटायझर तयार करण्यासाठीच्या परवान्याची अट सरकारने काढून टाकली आणि उत्पादन वाढलं. VIDEO : गर्भवती महिलेला घेऊन निघाली होती अॅम्ब्युलन्स, वाटेत आला सिंहांचा कळप मुबलक प्रमाणात उत्पादन सुरू झाल्याने बाजारात त्याची किंमतही बरीच कमी आहे. लखनौमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्चनेही सॅनिटायझर संशोधनाचे कार्य सुरू केले. लखनौ महानगरपालिकेला 200 लीटर तर पोलीस खात्याला 200 लीटर सॅनिटायझर दिले जातात. आता बरीच राज्यं उत्तर प्रदेशकडून हँड सॅनिटायझरची मागणी करत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाची प्रकरणं आहेत. त्यामुळे या राज्यांना सॅनिटायझरचा पुरवठा आता उत्तर प्रदेशातून होतो आहे. महाराष्ट्राची लालपरी उद्यापासून पुन्हा धावणार, प्रवास करण्यासाठी असतील ‘हे’ नियम महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधित आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात 41,642 रुग्ण सापडले होते. त्यामुळे इथे सॅनिटायझरची मागणीही मोठी आहे. देशामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने हे उत्तर प्रदेशात आहे. त्यामुळे या राज्यात आता सर्वात जास्त सॅनिटायझर तयार केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








