Home /News /pune /

पुणे ATS ची मोठी कारवाई, नारायणगाव येथे एकाला शस्त्रासह उचललं

पुणे ATS ची मोठी कारवाई, नारायणगाव येथे एकाला शस्त्रासह उचललं

पुणे दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि नारायणगाव पोलिसांना मोठी संयुक्त कारवाई केली आहे.

    रायचंद्र शिंदे जुन्नर, 4 जून : पुणे दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि नारायणगाव पोलिसांना मोठी संयुक्त कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ATSच्या अधिकाऱ्यांनी एकाला शस्त्रासह ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS)सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात गस्त करीत असताना ATSचे राजू पवार व किरण कुसाळकर यांनी नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व स्टाफ यांच्या मदतीने आरोपी रोहिदास बाबुराव पाबळे (वय- 37 वर्षे, रा.कावळ पिंपरी ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलं आहे. त्याचेवर बेकायदेशीर बिगरपरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारखे गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू पवार, पोलिस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, मोसिन शेख तसेच नारायणगाव पोस्टेचे योगेश गारगोटे, सचिन कोबल या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहे. अन्य बातम्या ...तर कोरोनाविरोधात HCQसारखं दुसरं औषध नाही; WHOशी संबंधित भारतीय तज्ज्ञाचा दावा कोरोनाला रोखण्यासाठी महिला तहसीलदारानं लढवली अनोखी शक्कल, बघा काय केलं?
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: ATS, Pune (City/Town/Village)

    पुढील बातम्या