Home /News /maharashtra /

कोरोनाला रोखण्यासाठी महिला तहसीलदारानं लढवली अनोखी शक्कल, बघा काय केलं?

कोरोनाला रोखण्यासाठी महिला तहसीलदारानं लढवली अनोखी शक्कल, बघा काय केलं?

पंढरपूर शहराजवळील वाखरी येथील एका शिक्षण संकुलात प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर तयार केलं आहे.

पंढरपूर, 4 जून: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. पंढरपुरातील कोविड केअर सेंटरमध्ये तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी लोक सहभागातून पश्चिम महाराष्ट्रातील पहिली हायटेक ओपीडी तयार केली आहे. तसेच क्वारंटाईन लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता सीसीटीव्हीतून नजर असणार आहे. पंढरपूर शहराजवळील वाखरी येथील एका शिक्षण संकुलात प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर तयार केलं आहे. 250 खोल्या असलेल्या दोन इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. पंढरपूर आणि शेजारील तालुक्यातील कोरोना रुग्ण, हाय रिस्क आणि सेकंड कॉन्टॅक्टमधील लोकांना येथे क्वारंटाईन करण्याची सोय केली आहे. अशा लोकांचे स्वॅब घेण्यासाठी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी लोकसहभागातून एक हायटेक ओपीडी तयार केली आहे. हेही वाचा -त्या गर्भवती हत्तीणीला मारणाऱ्या नराधमांचा शोध सुरू; देशभरातून वाढला दबाव पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली हायटेक ओपीडी आहे. सोलापूर जिल्ह्यात स्वॅब घेण्याची पहिली सोय या ठिकाणी केली आहे. एका रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर ओपीडी निर्जंतुक करूनच दुसरा रुग्ण आत प्रवेश करतो. येथील दोन इमारतीत 108 खोल्या असून सध्या एका खोलीत एकच व्यक्ती क्वारंटाईन केला आहे. या रुग्णाचं स्वॅब नमुने घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतरही त्यांना एकमेकांच्या संपर्कात येऊ देत नाहीत. यामुळे संसर्ग रोखला जात आहे. सध्या या ठिकाणी पंढरपूरसह शेजारील गावातील रुग्ण क्वारंटाईन आहेत. या दोन इमारती 39 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. हे वाचा- देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र या कॅमेऱ्यातून संपूर्ण इमारतीत काय सुरू आहे, याची माहिती मिळते. जर कोणी क्वारंटाईन रुग्णाने खोली बाहेर येऊन इतरांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न केला तर लगेच स्पिकर वरून त्यांना सूचना दिली जाते. यामुळे एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणे थांबवता येत आहे, पश्चिम महाराष्ट्रातील पहिली हायटेक ओपीडीची आता  एकच चर्चा सुरू झाली आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या