Home /News /coronavirus-latest-news /

...तर कोरोनाविरोधात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनसारखं दुसरं औषध नाही; WHO शी संबंधित भारतीय तज्ज्ञांचा दावा

...तर कोरोनाविरोधात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनसारखं दुसरं औषध नाही; WHO शी संबंधित भारतीय तज्ज्ञांचा दावा

WHO ने कोरोनावर उपचारासाठी hydroxychloroquine औषधाचं ट्रायल पुन्हा सुरू केल्यानंतर अशी प्रतिक्रिया आली आहे.

    नवी दिल्ली, 04 जून : भारतात सध्या हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine)आणि रेमडेसिवीर या दोन्ही औषधांचं कोरोनावर उपचारासाठी ट्रायल सुरू आहे. या दोन्ही औषधांच्या ट्रायलमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. मात्र हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध जर कोरोनाविरोधी उपचारासाठी उत्तम पर्याय ठरलं, तर यासारखं दुसरा उपचारच नाही, असं भारतातील तज्ज्ञ डॉ. शीला गोडबोले म्हणाल्यात. डॉ. शीला गोडबोले या जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये भारताच्या समन्वियका म्हणून कार्यरत आहेत. जागतिक आरोग्य संगघटनेनं आठवडाभरापूर्वीच हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधाचं ट्रायल थांबवलं होतं. या औषधाचं ट्रायल पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा बुधवारी WHO ने केली. जर हे औषध उपचार म्हणून प्रभावी ठरलं तर यासारखं दुसरं औषध नाही, असं भारतीय तज्ज्ञ म्हणालेत. हे वाचा - Lockdown निर्बंध शिथिल; आता मुंबईतून ठाणे, कल्याण, बदलापूरला जायला निर्बंध नाहीत सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत डॉ. शीला गोडबोले यांनी सांगितलं, "संपूर्ण जगाला कोरोनाव्हायरसविरोधातील प्रतिबंधात्मक आणि उपचार असं दोन्ही प्रकारचं औषध हवं आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वस्त आणि सुरक्षित अशा ओरल मेडिसीनची गरज आहे. अशा वेळी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध जर कोरोनाविरोधी उपचारासाठी उत्तम पर्याय ठरलं, तर त्यासारखा दुसरा उपचार नाही" "सध्या आम्ही remedisivir, lopinavir,  ritonavir आणि  hydroxychloroquine या चार औषधाचं ट्रायल करत आहोत. त्यापैकी HCQ चं ट्रायल सुरक्षित अहवाल विषेशत: मृत्यूचा अहवाल येईलपर्यंत तात्पुरतं थांबवलं होतं, बंद केलं नव्हतं", असं त्या म्हणाल्या. हे वाचा - कोरोनानं बाप-लेकाला केलं दूर, 7 दिवसाच्या बाळाला पाहण्यासाठी तडफडत होता जीव पण.. "Lopinavir हे औषधही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि एचआव्हीसाठी हे औषध वापरलं असल्याने त्याच्याबाबतचा अनुभवही आपल्याकडे आहे. मात्र तरीही आपल्याला अधिक चाचणीची गरज आहे. शिवाय रेमडेसिवीर औषधाला भारतात आपाल्कालीन उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. सध्या तरी कोणतं औषध चांगलं काम करत आहे, याबाबत अभ्यास सुरू आहे." असं डॉ. गोडबोले यांनी सांगितलं. हे वाचा - संरक्षण सचिवांनाच झाला कोरोनाचा संसर्ग, 30 अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाइन
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या