पुण्यात जन्मदात्यानेच आपल्या 9 वर्षींच्या मुलीला बनवली वासनेची शिकार!

पुण्यात जन्मदात्यानेच आपल्या 9 वर्षींच्या मुलीला बनवली वासनेची शिकार!

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात घडली आहे.

  • Share this:

जुन्नर, 21 डिसेंबर: राज्यात अलिकडे बलात्कार (Rape), मुलींची छेड काढणे, विनयभंगाच्या (Molestation) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच पुणे जिल्ह्यात (Pune District) नराधम बापानंच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला हवसची शिकार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जुन्नर तालुक्यातील (Junnar) पिंपरी पेंढार गावात घडली आहे. नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या वडिलांनीच लैंगिक अत्याचार केला आहे. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापास बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा..शेतातील उभ्या पिकासह शेतमालकावर केली करणी! पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड

मिळालेली माहिती अशी की, पिंपरी पेंढार गावात नराधम बापानं आपल्या पोटच्या अल्पवयीन नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली. या प्रकरणी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईनं ओतूर पोलिसात फिर्याद दिली होती.

फिर्यादीत म्हटलं आहे की, पीडित अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी आली होती. ती घरात एकटी होती. आई कामाला गेल्याचा फायदा घेत नराधम बापनं तिच्यावर बलात्कार केला. सायंकाळी आई घरी आल्यावर पीडितमुळे तिच्यावर बितलेला प्रसंग कथन केला.

पीडित मुलीच्या आईला ही घटना कळाल्यानंतर तिथं ओतूर पोलीस स्टेशन गाठून नराधम पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत ओतूर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

हेही वाचा...गिरीश महाजनांची वाट बिकट? नव्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

दरम्यान, काल पुण्यात अशीच एक घटना समोर आली होती. पुण्यातील एका डॉक्टरकडे काम मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा संबंधित विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कर्वेनगर परिसरात या डॉक्टरचा आयुर्वेदिक दावाखाना (Ayurvedic Hospital) आहे. येथे काम मागायला आलेल्या 57 वर्षीय महिलेचा या 48 वर्षीय डॉक्टरनं विनयभंग केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 21, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या