गिरीश महाजनांची वाट बिकट? नव्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

गिरीश महाजनांची वाट बिकट? नव्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

जामनेर, 21 डिसेंबर: जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (बीएचआर) घोटाळा (BHR Scam, Jalgaon)सध्या चांगलाच गाजतो आहे. त्यात या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपचे जामनेरचे आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन (BJP MLA Girish Mahajan) यांनी केला आहे. मात्र, जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी (Paras Lalwani) यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांच्या नावावर दोन दिवसांपूर्वी 25 कोटी रुपयांची मालमत्ता कवडी मोल किमतीत खरेदी केल्याचा गौप्यस्फोट माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे. यामुळे आता गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा...शरद पवारांचा शब्द ठरला महत्त्वाचा, दिवंगत भारत भालके यांच्या सुपुत्राची बिनविरोध

जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल, रविवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधत थेट आरोप केले. ते म्हणाले, गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांच्या नावे दोन दिवसांपूर्वी सुमारे 25 कोटींची मालमत्ता अवघ्या दीड कोटी रुपयांत खरेदी केली.

एवढं नाही तर बीएचआर पतसंस्थेतील घोटाळा त्याचबरोबर जळगाव शहरातील मोठी शैक्षणीक संस्था हडपण्यासाठी गिरीश महाजन यांनी मोठा कट रचला. आपल्या राजकीय विरोधकांविरुद्ध खोटी गुन्हे दाखल करत त्यांचा छळ केल्याचा आरोप पारस ललवाणी यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला आहे. त्याचबरोबर जामनेर नगरपालिकेत झालेल्या अनेक गैरव्यवहारांमागे देखील गिरीश महाजन यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप करून ललवाणी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

पत्नीच्या नावावर कोट्यावधींची मालमत्ता कवडीमोल किमतीत घेणारे गिरीश महाजन यांचा बीएचआरशी संबंध कसा असू नाही, असा सवाल करत या प्रकरणीची सखोल चौकशीची मागणी पारस ललवाणी यांनी केली आहे.

हेही वाचा...ही तर संजय राऊतांची पोटदुखी, 2024 ची भीती कशाला? भाजप नेत्यानं डागली तोफ!

दुसरीकडे, गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादावरून करण्यात आलेले सर्व आरोप खोडून काढले आहेत. या वादाशी आपला काडीचा संबंध नसताना आपल्यावर अतिशय संशयास्पद पद्धतीने रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा गंभीर प्रकार असून या मागे कुणी तरी ‘कलाकार’ असल्याचा आरोप भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 21, 2020, 2:14 PM IST

ताज्या बातम्या