मराठी बातम्या /बातम्या /पुणे /89 वर्षाच्या आजीला कोरोना होऊन गेल्याचंही कळालं नाही; नातवांनी घेतली पुरेपूर काळजी

89 वर्षाच्या आजीला कोरोना होऊन गेल्याचंही कळालं नाही; नातवांनी घेतली पुरेपूर काळजी

Pune News: आजीला कोरोनाची लागण झाली आहे, याची किचिंतशी भनकही लागू न देता नातवांनी डॉक्टरांच्या सल्लाने आपल्या आजीवर उपचार केले आहेत. एकाच घरात राहून तिची काळजी घेतली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर आजीला कोरोना झाल्याची माहिती नातवांनी दिली आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 30 मे: मागील दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना विषाणूशी झगडत आहे. दरम्यानच्या काळात मुलं आई वडिलांची काळजी घेत नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असं असताना औंध येथील दोन नातवांनी आपल्या आजीला कोरोनामुक्त करण्यासाठी जीवाचं रान केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी आजीला कोरोनाची लागण झाली आहे. याची किचिंतशी भनकही लागू दिली नाही. आजीला न सांगताचं नातवांनी तिच्यावर उपचार केले आहेत. 89 वर्षाच्या आजीला केवळ सर्दी आणि खोकला झाल्याचं सांगत नातवांनी तिच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले आहेत. यामुळे आजीला कोरोना होऊन गेल्याचंही कळालं नाही.

संबंधित आजीचं नाव कमला साठे असून त्या औंध येथील रहिवासी आहेत. साठे यांच्या घरी घरकाम करणाऱ्या मावशीला काही दिवसांपूर्वी बरं वाटत नव्हतं. त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. यावेळी 89 वर्षीय आजी कमला साठे यांनाही कोरोनाची बाधा झाली असावी, असा संशय नात इशानी आणि नातू सौमित्र यांना आला. त्यामुळे त्यांनी आपल्या आजीची कोरोना चाचणी केली. या चाचणीत त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

हे ही वाचा-कुत्र्यांमार्फत माणसांमध्ये आलेला Canine Coronavirus व्यक्ती-व्यक्तीमध्ये पसरतो?

त्यामुळे इशानी आणि सौमित्रसह घरातील सर्वचं सदस्यांच्या चिंतेत वाढ झाली. पण इशानी आणि सौमित्र यांनी आजीला कोरोना झाल्याचं न सांगण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर घरातील पन्नाशीच्या वयातील आई-वडील, काका-काकू, आत्या यांना दुसऱ्या घरात शिफ्ट केलं. आणि आजीला आवश्यक असणारी सर्व काळजी आम्ही घेतो, असा विश्वास त्यांनी आपल्या घरच्यांना दिला. यानंतर त्यांनी आजीला काहीही न सांगता तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली. त्याचबरोबर आजीला स्वतःची एक जागा तयार करून दिली.

हे ही वाचा-कोरोनातून बरं झाल्यानंतर लस घेण्याची गरज आहे का नाही? पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

दरम्यान तुम्ही घरात मास्क लावून घरात का वावरताय? असं आजीने विचारलं असता, या नातवांनी 'आम्हाला बरं नाही, आमच्यामुळे तुला त्रास होऊ नये' म्हणून काळजी घेत आहोत, असं सांगितलं. यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्लाने सर्व औषधोपचार केल्यानंतर अखेर 15 दिवसांनी 89 वर्षीय आजी कमला साठे ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. आजीचं मानसिक संतुलन ढासळू नये, म्हणून त्यांनी आजीला कोरोना झाल्याची माहिती न देताच तिच्यावर यशस्वी उपचार केला आहे.

First published:

Tags: Corona patient, Pune