मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कुत्र्यांमार्फत माणसांमध्ये आलेला Canine Coronavirus व्यक्ती-व्यक्तीमध्ये पसरतो का?

कुत्र्यांमार्फत माणसांमध्ये आलेला Canine Coronavirus व्यक्ती-व्यक्तीमध्ये पसरतो का?

कुत्र्यांमधील (Dog Coronavirus)  केनाइन कोरोनाव्हायरस (Canine Coronavirus) माणसांसाठी किती धोकादायक ठरू शकतो?

कुत्र्यांमधील (Dog Coronavirus) केनाइन कोरोनाव्हायरस (Canine Coronavirus) माणसांसाठी किती धोकादायक ठरू शकतो?

कुत्र्यांमधील (Dog Coronavirus) केनाइन कोरोनाव्हायरस (Canine Coronavirus) माणसांसाठी किती धोकादायक ठरू शकतो?

    मुंबई, 30 मे: गेल्या वर्षी आलेला कोरोना विषाणू (Coronavirus) जाता जाईना आणि तेवढ्यातच कुत्र्यांमधल्या कोरोना विषाणूचा (Dog Coronavirus) संसर्ग न्यूमोनिया (Pneumonia) झालेल्या काही माणसांमध्ये झाला होता (Human infected with dog coronavirus), असं शास्त्रज्ञांना आढळलं आहे. मलेशियातल्या (Malaysia) सारावाक इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आठ जणांना केनाइन कोरोनाव्हायरसची (Canine Coronavirus) लागण झाली होती, असं नंतरच्या संशोधनात आढळलं. त्याबद्दलचा अहवाल आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शास्त्रज्ञांनी 'क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीजेस' (Clinical Infectious Diseases) नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे.

    कुत्र्यांमधील कोरोनाव्हायरस माणसांमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय आता चिंतेत अधिक भर पडली आहे. या व्हायरसबाबत अनेक शंका मनात आहेत. तुमच्या मनातील अशाच काही शंकांच निरसन करूनया. केनाइन कोरोनाव्हायरबाबत प्रत्येक माहिती जाणून घ्या.

    - SARS-COV-2 या सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा केनाइन कोरोनाव्हायरस वेगळा आहे का?

    - कोविड-19 ला कारणीभूत असलेल्या SARS-COV-2 पेक्षा केनाइन कोरोनाव्हायरस वेगळा आहे. कोरोनाव्हायरस कुटुंबातल्या (Coronavirus Family) विषाणूंची चार गटांत विभागणी करता येऊ शकते. अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा कोरोनाव्हायरस. कोविड-19 साठी कारणीभूत असलेला कोरोना विषाणू बीटा ग्रुपमधला असून, केनाइन कोरोनाव्हायरस अल्फा ग्रुपमधला आहे.

    - केनाइन कोरोनाव्हायरस नवा आहे का?

    - केनाइन कोरोनाव्हायरस नवा नाही. शास्त्रज्ञांना त्याबद्दल 50 वर्षांपासून माहिती आहे. प्राण्यांचे व्हायरोलॉजिस्ट आणि काही श्वानपालक यांनाच त्याबद्दल माहिती होती. या विषाणूंचा मानवामध्ये संसर्ग झाल्याचं यापूर्वी कधीच आढळलं नव्हतं. मात्र आता कोरोना विषाणूंवर अचानक आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष केंद्रीत केलं गेल्यामुळे त्याबद्दलच्या अनेक गोष्टी उघड होत आहेत. अलिकडेच माणसांमध्ये याची लागण झाल्याचं अपघाताने समोर आलं.

    - विषाणूचा हा प्रकार शास्त्रज्ञांसमोर कसा आला?

    - शास्त्रज्ञ केनाइन कोरोनाव्हायरसच्या शोधात नव्हते, तसंच संबंधित रुग्ण बरे होऊनही बरेच दिवस झाले होते. पॅन-सीओव्ही (Pan Co-V Test) टेस्ट अर्थात सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूचं अस्तित्व ओळखणारी टेस्ट विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू होतं. प्रयोगशाळेत विकसित केलेल्या विषाणूंच्या नमुन्यांवर ही चाचणी यशस्वी ठरल्यावर शास्त्रज्ञांनी 192 माणसांच्या घशाच्या स्वॅबचे (Swab) नमुने घेतले. त्यात मलेशियातल्या हॉस्पिटलमधल्या न्यूमोनियातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा समावेश होता. त्यातल्या नऊ नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूंचं अस्तित्व आढळलं.

    हे वाचा - कोरोना हा चिनीच! वुहान लॅबमध्ये तयार झाला व्हायरस; सापडला मोठा पुरावा

    त्यांचं पुढे विश्लेषण केल्यावर लक्षात आलं, की पाच नमुन्यांतले कोरोना विषाणू हे मानवात सर्दीला कारणीभूत असलेले विषाणू आहेत. त्यानंतर आणखी चार पॉझिटिव्ह पेशंट्स असल्याचं आढळलं. त्यानंतर केनाइन कोरोनाव्हायरसबद्दल अधिक माहितीसाठी शास्त्रज्ञांनी आठही पेशंट्सच्या नाकातील आणि घशातील स्रावाचे नमुने घेतले. प्रयोगशाळेत ते नमुने कुत्र्याच्या पेशींमध्ये सोडून त्यात जिवंत विषाणू आहे का, ते तपासण्यात आलं. एका नमुन्यातल्या विषाणूचं पुनरुत्पादन झाल्याचं आढळलं. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीच्या साह्याने विषाणूचे कण पाहता आले. त्या विषाणूचं जीनोम सिक्वेन्सिंगही शास्त्रज्ञांनी केलं. डुक्कर, मांजर यांच्यात आढळणाऱ्या अन्य अल्फा कोरोनाव्हायरसेसशी त्याचं साधर्म्य असल्याचं आढळलं.

    - यामुळे पेशंटना न्यूमोनिया होतो का?

    - त्याबद्दलचा पुरावा हाती नाही. सध्या तरी त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आठपैकी सात पेशंटना त्याच वेळी अॅडेनोव्हायरस (Adenovirus), एन्फ्लुएंझा किंवा पॅराएन्फ्लुएंझा यांपैकी एका विषाणूचा संसर्गही झाला होता. यापैकी कोणत्याही विषाणूमुळेही न्यूमोनिया होतो. त्यामुळे तेच विषाणू यासाठी कारणीभूत असावेत, असा अंदाज आहे. केनाइन कोरोनाव्हायरसेस आणि न्यूमोनिया यात काही तरी संबंध असू शकतो. मात्र तेच न्यूमोनियाचं कारण आहे असं म्हणता येत नाही.

    - केनाइन कोरोनाव्हायरस संसर्गजन्य आहे का?

    - मलेशियात आढळलेला केनाइन कोरोनाव्हायरसचा संसर्ग अन्य व्यक्तींना होऊन मोठ्या प्रमाणात तो पसरू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली. मात्र हा संसर्ग 2017-2018 मध्ये आढळला होता, हे अनेक बातम्यांमध्ये लिहिलेलंच नाही. गेल्या तीन-चार वर्षांत त्याचा पुढील संसर्ग आढळलेला नाही. त्यामुळे त्याची संसर्गक्षमता फारशी नाही हे स्पष्ट झालं.

    हे वाचा - UK मध्ये तिसऱ्या लाटेचा धोका, भारतावर काय होणार परिणाम?

    सध्या त्याबद्दल अधिकाधिक संशोधन सुरू असल्याने अनेक वेगवेगळे निष्कर्ष दिसू शकतात. हे केवळ शास्त्रीय अभ्यासासाठी असल्याने त्याची काळजी करण्याची गरज नाही; मात्र नव्या संभाव्य धोक्यासाठी तयार राहण्याकरिता या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो.

    First published:

    Tags: Corona spread, Coronavirus, Dog, Health, Serious diseases